काँग्रेसने सर्व समाजाला न्याय दिला
By Admin | Updated: September 1, 2014 00:26 IST2014-09-01T00:06:28+5:302014-09-01T00:26:17+5:30
सेलू : सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही कृषी संवर्धन व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली़

काँग्रेसने सर्व समाजाला न्याय दिला
सेलू : काँग्रेस पक्षाने सर्व जाती- धर्मातील घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे़ सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही कृषी संवर्धन व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली़
सेलू येथे नगरपालिकेच्या श्री साई नाट्यमंदिरात रविवारी आयोजित अल्पसंख्यांक मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी आ़ रामप्रसाद बोर्डीकर होते़ नगराध्यक्ष सुरेश कोरडे, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, सभापती दत्तराव मोगल, तालुकाध्यक्ष नामदेव डख, विलास रोडगे, वहीद अन्सारी, रफिक अली खान, रहीम खान पठाण, रघुनाथ बागल, महेबुब कुरेशी आदींची उपस्थिती होती़ शासनस्तरावर अल्पसंख्यांकासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे़ तसेच मुस्लीम समाजातील मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरातील बैल बाजार व कत्तलखान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून निधीची तरतूद लवकरच करू, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले़ शहरात मुस्लिम समाजासाठी अद्ययावत शादीखाना उभारण्यासाठी सिल्लोड शहरातील मॉडेलचा वापर करावा, असेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले़
आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच सर्व समाज घटकाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष सुरेश कोरडे, नगरसेवक रहीम खान पठाण, नामदेव डख यांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन जखीयोद्दीन खतीब यांनी केले़ अबरार बेग यांनी आभार मानले़ मेळाव्यात राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ मेळाव्यास नागरिकांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन
तालुक्यातील अल्पसंख्यांक मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शहरातील सारंग गल्ली परिसरात १०० मुलींचे वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन पशूसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले़ यावेळी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, नगराध्यक्ष सुरेश कोरडे, हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, नमादेव डख, वहीद अन्सारी, रघुनाथ बागल, रवींद्र डासाळकर, रहीम खाँ पठाण, रफीक अली खाँ, अ़ रशिद अ़ रज्जाक बागवान, सभापती दत्तराव मोगल, धारवारकर यांची उपस्थिती होती़ ३ कोटी १० लाख रुपये खर्चून मुलींच्या वसतिगृहाचे तीन मजली बांधकाम करण्यात येणार आहे़