बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

By Admin | Updated: February 2, 2016 00:26 IST2016-02-02T00:14:56+5:302016-02-02T00:26:59+5:30

येणेगूर : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलने सर्वपक्षीय पॅनलचा धुव्वा उडवित १८ पैकी १४ जागांवर विजय मिळविला़

Congress flag on market committee | बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा


येणेगूर : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलने सर्वपक्षीय पॅनलचा धुव्वा उडवित १८ पैकी १४ जागांवर विजय मिळविला़ तर ग्रामपंचायत गटातील चार जागांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत़ विरोधी पॅनला एकही जागा मिळाली नाही़
१९६१ साली स्थापन झालेली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षे कै़ महाधवराव पाटील यांच्या ताब्यात होती़ त्यानंतर औशाचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटीलही ही बाजार समिती वर्षानुवर्षापासून निर्विवाद आपल्या ताब्यात ठेवली आहे़ या निवडणुकीत काँग्रेस पॅनल विरूध्द सर्वपक्षीय पॅनल अशी लढत झाली़ युवा नेते शरण पाटील यांनी प्रचाराची धुरा हाती घेवून प्रचार यंत्रणा राबविली़ परिणामी १८ पैकी १४ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे़ तर ग्रामपंचायत गटाच्या चार जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे़ सोमवारी नगर परिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही़ए़शिंदे, जाधव, आण्णाराव कुंभार आदीच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली़ यात सेवा संस्था मतदार संघातून काँग्रेसचे ११ उमेदवार, व्यापारी मतदार संघातून दोन, हमाल-मापाडी मतदार संघातून एक असे १४ उमेदवार विजयी झाले़
यात काँग्रेसचे बापूराव पाटील (२१९), बसवराज कारभारी (२०६), गोविंद पाटील (२११), बसवराज पाटील (२९२), धनराज जाधव (१९७), दगडू गायकवाड (१९८), महादेव टेंकाळे (२९२), श्रीदेवी बिराजदार (२२५), मंगलाबाई लामजणे (२१९), इतर मागास प्रवर्गातून सायबण्णा हिरमुखे (२२४), विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून विजयकुमार सोनकटाळे (२२४), व्यापारी गटातून विद्यमान नगराध्यक्ष धनराज मंगरुळे (१२४), आयुब मासूलदार (९८) तर हमाल मापाडी गटातून चंद्रकांत गायकवाड (७७) हे उमेदवार विजयी झाले़ ग्रामपंचायत गटातून चार जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे़ यात काही नवीन गावे या गटामध्ये जोडण्यात आल्याने निकाल लावण्यात आला नाही़ (वार्ताहर)

Web Title: Congress flag on market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.