कृउबा समितीवर काँग्रेसचा झेंडा
By Admin | Updated: August 6, 2015 01:04 IST2015-08-06T01:00:07+5:302015-08-06T01:04:43+5:30
औरंगाबाद : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर

कृउबा समितीवर काँग्रेसचा झेंडा
औरंगाबाद : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर बुधवारी (दि.५ आॅगस्ट ) काँग्रेसचा झेंडा फडकला, पण त्यासाठी नशिबाचा हातभार घ्यावा लागला. समसमान मते पडल्याने चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. सभापतीपदासाठी नशिबाचा कौल काँग्रेसचे संजय औताडे यांना मिळाला. भाजपचे भागचंद ठोंबरे यांना उपसभापतीपदाची लॉटरी लागली.
या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यात माजी आमदार कल्याण काळे यांच्या रुपाने काँग्रेसने आपली स्थिती मजबूत केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याण काळे यांनी शेतकरी सहकारी विकास पॅनल तर हरिभाऊ बागडे यांनी सहकारी संस्था विकास पॅनल उभे केले होते. काळे यांच्या पॅनलचे ७ संचालक तर बागडे यांच्या पॅनलचे ६ संचालक निवडून आले होते. दोन्ही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे सभापती आपल्याच पॅनलचा बनावा व बाजार समितीवर आपली सत्ता स्थापन व्हावी, यासाठी बागडे व काळे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपचे निवडून आलेले दोन बंडखोर उमेदवार संजय औताडे व विकास दांडगे कोणाला मत देतात. दोन व्यापारी संचालक काय भूमिका घेतात व हमाल-मापाडीचा एक संचालक कोणाच्या बाजूने उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोणीच आपले पत्ते खोलण्यास तयार नव्हते. बुधवारी सकाळी ११ वाजता जाधववाडीतील कृउबाच्या बैठक हॉलमध्ये सभापतीच्या निवडणुकीला सुरुवात झाली. अपक्ष उमेदवार संजय
भाजपचे नेते विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सहकारी संस्था विकास पॅनल व काँगे्रसचे माजी आमदार कल्याण काळे यांच्या शेतकरी सहकारी विकास पॅनलला सभापतीपद व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत १८ पैकी ९-९ असे समान मते मिळाली.
४यामुळे लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. चार वर्षे वयाच्या कर्तव्य विटोरे या मुलीच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या.