शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काँग्रेसचा उंचावता आलेख

By admin | Updated: September 29, 2014 01:00 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील मागील चार विधानसभा निवडणुकांचा मागोवा घेतला असता काँग्रेसचा आलेख उंचावता असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील मागील चार विधानसभा निवडणुकांचा मागोवा घेतला असता काँग्रेसचा आलेख उंचावता असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेची प्रगती स्थिर असून, भाजपाचा मात्र सफाया झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही गतनिवडणुकीत खाते उघडले आहे. २००९ च्या आधी १९८० पासून जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ होते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ नंतर जिल्ह्यात नऊ मतदारसंघ अस्तित्वात आले. १९९५ सालच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार निवडून आले. वैजापूर आणि कन्नड या दोन जागा काँग्रेसकडे होत्या. सिल्लोड आणि औरंगाबाद पूर्व या जागा भाजपाने जिंकल्या. तर औरंगाबाद पश्चिम आणि पैठणमध्ये शिवसेनेने विजय मिळविला, तर गंगापूरमध्ये अपक्षाने बाजी मारली. राज्यात युतीची सत्ता आली तर जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाची समान शक्ती राहिली. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात दोन काँग्रेसविरुद्ध शिवसेना- भाजपा युती अशी लढत झाली. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांची आघाडी होऊन आघाडीची सत्ता आली. यावेळीही जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले. शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले. तर भाजपाने सिल्लोड आणि औरंगाबाद पूर्व या आपल्या दोन जागा कायम राखल्या. वैजापूर मतदारसंघ काँग्रेसने गमावला; परंतु औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ खेचून घेतला. वैजापूरसह गंगापूर आणि पैठण या तीन ठिकाणी विजय मिळविला. २००४ साली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. यावेळी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७१ जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सिद्ध केले. जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ शिवसेनेने जिंकले. वैजापूर, गंगापूर, पैठणसह कन्नडची जागा शिवसेनेने खेचली. तर काँग्रेसने कन्नडची जागा गमावून औरंगाबाद पूर्वची जागा जिंकली. भाजपाला केवळ सिल्लोडच्या जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीपासून जिल्ह्यात भाजपाची पीछेहाट सुरू झाली. तिन्ही निवडणुकांत काँग्रेस पक्ष स्थिर राहिला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नऊ मतदारसंघांपैकी २००९ मध्ये काँग्रेसने तीन जागा जिंकून आपला आलेख उंचावला. औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि सिल्लोड याठिकाणी विजय मिळविला. तर वैजापूर आणि औरंगाबाद पश्चिम या दोन जागा शिवसेनेला मिळाल्या. पैठणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. कन्नडची जागा मनसेच्या पदरात पडली, तर औरंगाबाद मध्य आणि गंगापूर मतदारसंघात अपक्षांनी बाजी मारली. या निवडणुकीत शिवसेनेला मात्र जोरदार फटका बसला. जिल्ह्यात दोन मतदारसंघ वाढले असताना शिवसेनेच्या आमदारांची संख्या चारवरून दोनवर आली, तर भाजपाचा पूर्ण सफाया झाला, तर काँग्रेसने तीन जागा मिळवीत वर्चस्व सिद्ध केले.