महापालिकेत काँग्रेसला पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:32 IST2017-10-06T00:32:45+5:302017-10-06T00:32:45+5:30
सद्या कार्यरत असलेल्या सत्ताधाºयांकडून भारतीय लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपण त्यांचा हा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.

महापालिकेत काँग्रेसला पर्याय नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड : सद्या कार्यरत असलेल्या सत्ताधाºयांकडून भारतीय लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपण त्यांचा हा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.
नांदेड - वाघाळा मनपाच्या हद्दीतील सिडको- हडको व वाघाळा परिसरातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते हडको येथील शिवाजी उद्यानाच्या प्रांगणात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार डॉ. करूणा जमदाडे, श्रीनिवास जाधव, मंगला गजानन देशमुख, ललिता मुकुंद बोकारे व विनय विश्वाभंर पाटील- गिरडे यांच्यासह गणपतराव तिडके, माधवराव पांडागळे, नारायणराव जाधव व प्रसिद्ध गायक अनिरूद्ध बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा. चव्हाण म्हणाले, भाजप तसेच शिवसेना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.‘राष्टÑवादी’ काँग्रेसचे घडयाळ तर सद्या बंद पडले आहे, त्यामुळे या घडयाळाला आता चावी देवूनही उपयोग नाही. याचा सिडकोवासियांनी विचार करावा असे ते यावेळी म्हणाले. कुठल्याही भुलथापांना बळी न पडता शहर व परिसराच्या सर्वांगिन विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी रहा असे आवाहन त्यांनी केले. सरकारची तीन वर्ष झाली कहाँ गये अच्छे दिन असा सवाल करीत, सर्वसामान्यांची दिशाभूल करणाºयांना आता थारा देवू नका असे आवाहनही चव्हाण यांनी केले. शहर विकासासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच आज शहराचे चित्र बदलताना दिसत असल्याचे सांगत, विकासाचा हा प्रवाह पुढे घेवून जाण्यासाठी काँग्रेसला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस पक्ष सोडला, तर अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणे शक्य झालेच नाही, असे नमूद करून काही राजकीय पक्षाच्या लोकांना तर माणसे पकडून आणून उभे करण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी हाणला.
भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केले नसताना कांही नेते भाजपचे असल्याच्या तोºयात वावरत आहेत, त्यामुळे मतदारांनी त्यांच्या थापांना बळी पडू नये, असे नमूद करून लोकांचा आजही आपल्या काँग्रेस पक्षावर विश्वास कायम असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. २०१९ मध्ये राज्यात आणि देशात ही सत्ता पालटल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.