राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने
By Admin | Updated: June 9, 2017 00:47 IST2017-06-09T00:43:10+5:302017-06-09T00:47:37+5:30
नांदेड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ येथील आयटीआय चौकात काँग्रेसने गुरूवारी निदर्शने केली़

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ येथील आयटीआय चौकात काँग्रेसने गुरूवारी निदर्शने केली़ शासनाची ही कृती म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल असल्याची टीका माजी राज्यमंत्री तथा आ़ डी़ पी़ सावंत यांनी केली़
महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सायंकाळी आ़ डी़ पी़ सावंत व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली़ यावेळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला़
खा़ राहुल गांधी मध्यप्रदेशातील आंदोलन करणाऱ्यांना भेटण्यासाठी व गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी जात होते़ यावेळी शासनाने त्यांना अटक केली़ ही अटक म्हणजे विरोधकांची मुस्कटदाबी आहे़ शासनाची ही कृती हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी असून या अन्यायी सरकारविरूद्ध काँग्रेस पक्षाचा लढा सुरू राहील, असा इशारा आंदोलन प्रसंगी आ़ सावंत यांनी दिला़
माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ़ रोहिदास चव्हाण, नगरसेवक विजय येवनकर, किशोर स्वामी, सुमती व्याहळकर, अमित तेहरा, सभापती शीला निखाते, रंगनाथ भुजबळ, आनंद चव्हाण, शमीम अब्दुला, राजेश पावडे, पप्पु कोंडेकर, विठ्ठल पावडे, उमेश पवळे, उमेश चव्हाण, विलास धबाले, संदीप सोनकांबळे, मंगेश कदम, संतोष मुळे, डॉ़ विश्वास कदम, विनय गिरडे पाटील, मुदिराज, दुष्यंत सोनाळे, सतीश राखेवार, करूणा जमदाडे, पुनिता रावत, पद्मा झंपलवाड, धम्मा कदम, विशाल खेडकर, बालाजी सूर्यवंशी, शेख फारूख, रहीम खान, युवराज वाघमारे आदी उपस्थित होते़