शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ठाकरे भर सभेत माझ्या कानात म्हणाले, 'काँग्रेसवाले खूप त्रास देतात... आपण बसून बोलू'; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 12:32 IST

Raosaheb Danve: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला मोठा दावा

Raosaheb Danve: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील भाजपा नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. या कार्यक्रमानंतर रावसाहेब दानवे यांनीही मोठं विधान केलं आहे. काँग्रेसवाले खूप त्रास देतात एकदा या आपण बसून बोलू, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी मला कानात सांगितलं आहे, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. 

'व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी...', दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना भाजपा मंत्र्यांचा उल्लेख एकत्र आलो तर भावी सहकारी असा केला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या कार्यक्रमानंतर रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत एक मोठा दावा केला आहे. 

रावसाहेब दानवेंनी भर सभेत मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठिंबा मागितला, उद्धव ठाकरेंनी शब्दच दिला!

मुख्यमंत्र्यांनी असं विधान का केलं याबाबत विचारण्यात आलं असताना दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना आलेल्या अनुभवावरुनच ते असं म्हणाले असतील, असं दानवे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांचा अनुभव काही चांगला राहिलेला नाही. त्यांना काम करताना त्रास होतोय हे दिसतंय म्हणूनच ते आम्हाला भावी सहकारी म्हणाले असावेत, असं दानवे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी कानाता सांगितलं...एकदा बसून बोलू!मुख्यमंत्री ठाकरे यांनी भर सभेत मला सांगितलंय की हे काँग्रेसवाले मला त्रास देतात..तुम्ही एकत्र या आपण बसून बोलू आणि हे सांगताना व्यासपीठावर बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. त्यांनीही हे ऐकलं आणि तेही हसले, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. दानवेंच्या विधानामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघण्याची शक्यता आहे. 

आम्ही पूर्व मित्रच, आता पुन्हा मित्र होऊ!भाजपा आणि शिवसेना हे पूर्वीचे मित्र होते. पण शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला. असं असलं तरी शिवसेनेनं तयारी दाखवली तर भाजपा नेहमीच समविचारी पक्षाचं स्वागतच करेल. आम्ही पूर्व मिक्ष होतोच, आता पुन्हा मित्र होऊ शकतो, असंही दानवे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा