Uddhav Thackeray: रावसाहेब दानवेंनी भर सभेत मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठिंबा मागितला, उद्धव ठाकरेंनी शब्दच दिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:55 AM2021-09-17T11:55:08+5:302021-09-17T11:55:55+5:30

Uddhav Thackeray: रावसाहेब दानवेंच्या आवाहनावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात दानवेंना एक शब्द दिला आहे. त्यामुळे दानवेंच्या मागणीला आता राज्य सरकार देखील पाठिंबा देणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Raosaheb Danve sought support from Chief Minister Thackeray for mumbai nagpur bullet train | Uddhav Thackeray: रावसाहेब दानवेंनी भर सभेत मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठिंबा मागितला, उद्धव ठाकरेंनी शब्दच दिला!

Uddhav Thackeray: रावसाहेब दानवेंनी भर सभेत मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठिंबा मागितला, उद्धव ठाकरेंनी शब्दच दिला!

googlenewsNext

Uddhav Thackeray: औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी रावसाहेब दानवेंच्या आवाहनावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात दानवेंना एक शब्द दिला आहे. त्यामुळे दानवेंच्या मागणीला आता राज्य सरकार देखील पाठिंबा देणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

'व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी...', दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी रावसाहेब दानवे प्रयत्न करत आहेत. तसं त्यांनी आजच्या भाषणातही बोलून दाखवलं. त्यावर मुख्यमंत्री ठाकरेंनी दानवेंना पाठिंबा दिला. "रावसाहेब दानवेंना शब्द देतो. तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठिंबा देतो", असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर रावसाहेब दानवेंच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. तर उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला. 

मुख्यमंत्री महोदय तुम्ही पाठिशी उभं राहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पाठिंबा जाहीर करुन टाकला. "मराठवाड्यात आपण भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करत आपण भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही. तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या. लोकांची कामं होणं महत्त्वाचं", असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

माझ्या राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा जर बुलेट ट्रेनचा मार्ग होणार असेल तर मी तुमच्यासोबत आहे. रावसाहेब तुम्ही प्रेझेंटेशन दिलं नाही तरी चालेल, आम्ही तुमच्या पाठिशी उभं राहू, असा शब्दच मुख्यमंत्र्यांनी दानवेंना दिला आहे. 

Web Title: Raosaheb Danve sought support from Chief Minister Thackeray for mumbai nagpur bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.