‘लोकार्पणा’त काँग्रेस-भाजपात जुंपली

By Admin | Updated: December 29, 2016 23:11 IST2016-12-29T23:10:46+5:302016-12-29T23:11:46+5:30

जालना : सिमेंट रस्ते व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आदि विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले.

Congress-BJP combine in 'public memory' | ‘लोकार्पणा’त काँग्रेस-भाजपात जुंपली

‘लोकार्पणा’त काँग्रेस-भाजपात जुंपली

जालना : कष्टकरी, कामगार, श्रमजीवी आणि दुर्बल घटकांचे वास्तव्य असलेल्या चंदनझिरा भागात माजी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली २ कोटी ८० लाख रूपये खर्चाची विकास कामे पूर्ण झाली असून, यापुढेही या भागात अंतर्गत जलवाहिनी, भूमिगत गटार, स्वच्छतेसह विकास कामे होतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी गुरुवारी येथे दिली.
जालना नगर पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चंदनझिरा भागात २ कोटी ८० लाख रूपये खर्चाचे सिमेंट रस्ते व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आदि विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आ. कैलास गोरंट्याल होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, पालिकेतीले गटनेते गणेश राऊत, अक्षय गोरंट्याल, नगरसेविका मालन दाभाडे, महावीर ढक्का, विनोद रत्नपारखे, आरेफ खान, रमेश गोरक्षक, छाया वाघमारे, डॉ. प्रिती कोत्ताकोंंडा, हरेश देवावाले, श्रावण भुरेवाल, शेख शकील, संजय भगत, बाबूराव जाधव, राजेंद्र वाघमारे, राहुल हिवराळे, राधाकिसन दाभाडे उपस्थित होते.
नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, शहरात पुढील वर्षी अंतर्गत जलवाहिनीचे काम लवकरच सुरू होणार असून, याची सुरूवातच चंदनझिरा भागातून केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गणेश राऊत म्हणाले की, चंदनझरिा भागात कैलास गोरंट्याल यांनी दिलेल्या आमदार निधीतून मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले. यासोबतच लहुजीनगर ते सुंदरनगर या रस्त्याचे कामही प्रगतीपथावर आहेत.

Web Title: Congress-BJP combine in 'public memory'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.