शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

प्रशासकीय नियोजनाअभावी शहरात जीवनावश्यक वस्तूपुरवठ्यात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 7:25 PM

मागील ६ दिवसांपासून फळ, भाजीपाला अडत बाजार, भाजीमंडई बंद असल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप अडत्यांनी केला आहे

ठळक मुद्दे प्रशासनाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे शहरवासीयांमध्ये संभ्रमभाजीपाला, फळे सडून झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीचे कुणालाच सोयरसुतक नाही 

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि बाजारपेठेत फळ,  भाजीपाला व किराणा खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यात प्रशासनाला सतत अपयश येत आहे. मुळात प्रशासनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरून  सकाळी एक, रात्री उशिरा एक, असे वेगवेगळे आदेश काढण्यात येत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. त्यात निर्णय घेणा-या व अंमलबजावणी करणा-या यंत्रणेत ताळमेळ नसल्याने, गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.   

शहरात कोरोनाबाधितांची संख्या ११०० च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. यामुळे परिस्थिती बघून  प्रशासनाला निर्णय घ्यावे लागत आहे; पण निर्णय घेताना  विभागीय आयुक्त एक आदेश काढत आहेत, जिल्हाधिकारी दुसरा आदेश काढत आहेत, तिसरा आदेश पोलीस आयुक्त काढत आहे, तर चौथा आदेश मनपा आयुक्त काढत आहेत. यामुळे उद्या दुकाने सुरू राहणार की बंद राहणार याविषयी संभ्रम निर्माण होत आहे. व्यापारी प्रतिनिधींनी आरोप केला की, मुळात प्रशासनात एकवाक्यता नसल्याने संभ्रम आणखी वाढत आहे. प्रशासनाने जर भाजीपाला, फळ विक्री व किराणा विक्रीला दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी दिली असती, तर बाजारपेठेत गर्दी झालीच नसती. प्रशासन रात्री उशिरा आदेश काढून उद्यापासून किराणा, भाजीपाला विक्री बंद करते. यामुळे फळ व भाजीपाल्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

मागील ६ दिवसांपासून फळ, भाजीपाला अडत बाजार, भाजीमंडई बंद असल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप अडत्यांनी केला आहे, तर काहीच नियोजन नसल्याने व मैदानावर तात्पुरता भरविण्यात येणारा भाजी बाजारही स्थानिकांच्या विरोधामुळे बंद पडल्याने गुरुवारी बाजार उघडल्यावर सर्व गर्दी जाधववाडीत होईल, अशी भीती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी व्यक्त केली, तर किराणा होलसेल व किरकोळ दुकानाचा वेळ दुपारपर्यंत ठेवल्याने खरेदीसाठी एकच गर्दी जुन्या मोंढ्यात उसळणार आहे. सलग बाजारपेठ सुरू ठेवून  सायंकाळी ५ वाजेपर्यंत विक्रीला परवानगी दिली, तर ग्राहकांमध्ये किराणा न मिळण्याची भीती कमी होईल व बाजारातील गर्दी कमी होईल. मात्र, प्रशासन व्यापारी संघटनांना विचारात न घेताच आदेश काढत असल्याने गोंधळ निर्माण होत असल्याचेही व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले. 

प्रशासन चर्चा करीत नाहीशेतक-यांचे हित लक्षात घेता बाजार समितीमधील सर्व अडत व्यवहार सुरू ठेवा, असा आदेश पण संचालकांनी काढला आहे, तर स्थानिक प्रशासन कधी वेळेचे बंधन घालते, तर कधी अचानक व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश काढते. आदेश देण्यापूर्वी बाजार समिती सभापती, संचालकांशी चर्चा केली जात नसल्याने सर्व गोंधळ उडतो.  किरकोळ भाजीपाला विक्रीची मंडई भरविण्याची जबाबदारी मनपाची आहे; त्यांचे शहरात ४१ ठिकाणी मंडई भरविण्याचे नियोजन बारगळले, त्यामुळे जाधववाडीत  गर्दी उसळत आहे.  -राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

प्रशासनात ताळमेळाचा अभावप्रशासनात ताळमेळाचा अभाव असल्याने बाजारपेठेसंदर्भातील कोणताही निर्णय यशस्वी होत नाही. किराणा दुकान सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत उघडी ठेवली, तर ग्राहकांमधील बंदची भीती कमी होऊन ते धान्यसाठा करणार नाहीत. यासाठी बाजारपेठेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याआधी व्यापारी संघटनेशी प्रशासनाने चर्चा करावी. -लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

 नुकसान कोण भरून देणार?रमजान महिन्यामुळे व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात फळे मागविली आहेत. मात्र, प्रशासनाने पूर्वसूचना न देता, अचानक रात्री निर्णय घेत फळ, भाजीपाला विक्री बंद केली. मागील ५ दिवसांत फळे, भाजीपाला खराब होऊन ५० लाखांचे नुकसान झाले. हे नुकसान कोण भरून देणार. ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे फळे शिल्लक होती, त्यांनी दुप्पट भावात विकून ग्राहकांना लुटले. - इसा खान,  अध्यक्ष, फळ, भाजीपाला अडत असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद