शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

एक पेपर औरंगाबादला, दुसरा अहमदनगरला; भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:40 AM

अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. 

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील भरतीच्या परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. विविध पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, विविध संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळेत ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. पूर्वी गट - क आणि गट - ड संवर्गातील पद भरतीसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु परीक्षेच्या एक दिवस अगोदर गोंधळामुळे परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आली.वेगवेगळ्या पदांची परीक्षाही एकाच वेळेत आली आहे. त्यामुळे दोन पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. यात काहींना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आले आहेत. आरोग्य विभागात गोंधळ एका उमेदवाराला गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल पदाच्या परीक्षेसाठी २४ ऑक्टोबरला औरंगाबादेतील खाराकुंवा केंद्र देण्यात आले आहे. तर त्यालाच सांख्यिकी अन्वेषक पदासाठी अहमदनगर केंद्र देण्यात आले आहे. एक परीक्षा सकाळी सकाळी १० ते दुपारी १२ तर दुसरी  त्याच दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार आहे.