शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

भाजप कार्यकर्त्यांमध्ये घालमेल; राज्यात सत्ता आल्यास आनंद, चिंता वाढत्या स्थानिक स्पर्धेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 12:01 IST

शिवसेनेची ए टीम सोबत आल्यास आपले काय होणार?

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले असून, त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्ता मिळवली तर आपले काय होणार, या चिंतेने भाजपतील इच्छुक आतून धास्तावले आहेत.

ते सध्या उघडपणे बोलत नसले तरी मागील अडीच वर्षे भाजपचे काम करताना शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जो ‘पंगा’ घेतला आहे, त्याचे फळ म्हणून पुन्हा राजकीय बळी जाणार असेल तर आपण काय करायचे, यावर अनेकजण खल करू लागले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद, ९ पंचायत समिती, महापालिका आणि चार नगरपालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. तसेच पुढे विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय उलथापालथीचा जिल्ह्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेसाठी भाजपकडून तयारी करीत असलेल्यांची प्रतिक्रिया आज जरी पक्ष भावनेच्या बाजूने असली तरी भविष्यातील समीकरणावर सगळे काही अवलंबून असेल, असेही मत अनेकांनी मांडले.

हिंदुत्व टिकवणे महत्त्वाचेमध्य मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार संजय केणेकर म्हणाले, सध्या हिंदुत्व टिकवणे महत्त्वाचे आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल. पक्ष आदेश व हिंदुत्वासाठी आमच्यासारख्यांचा बळी जात असेल तर आनंदच आहे. आज शिवसैनिकांच्या भावना अनावर होत असल्याचे पाहिले; परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेची युती झाल्यानंतर हिंदुत्वाच्या भावनांचे काय झाले होते, असा सवालही केणेकर यांनी केला.

त्याग हा आमचा इतिहास आहेपश्चिम मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार राजू शिंदे म्हणाले, त्याग हा आमच्या पक्षाचा इतिहास आहे. राज्याच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस हे जर मुख्यमंत्री होणार असतील तर २५ वेळा आमच्या अपेक्षांचा भंग झाला तरी चालेल. आगामी निवडणुकीत पक्षादेश शिरसावंद्य असेल. त्यागाची परंपरा असलेला पक्ष आहे. जनसंघापासून ती परंपरा चालत आलेली आहे. पुढे काय होईल ते होईल; परंतु भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझे काम सुरूच राहील.

निवडणुकीत भाजपला होणार फायदापैठण : वरिष्ठ पातळीवर राजकारणात आगामी काळात अनेक बदल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद यामुळे वाढणार असल्याने भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला आनंद आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून, काम करणाऱ्यास पक्षात संधी दिली जाते. सध्याच्या राजकारणामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे. पैठणमधून भाजपच पुढे येईल, असे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी नमूद केले.

बऱ्यापैकी मोर्चेबांधणीकन्नड : विधानसभा मतदारसंघ कन्नडमध्ये भाजपने मागील पाच वर्षांत बऱ्यापैकी बांधणी केलेली आहे. बूथनिहाय समित्या झाल्या आहेत. विस्तारकांचे काम सुरू असून, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तालुका दत्तक घेतला आहे; तर रस्त्यांची कामे प्रस्तावित असल्याने आगामी काळात निवडणुका झाल्यास भाजपलाच यश मिळेल, असा दावा इच्छुक उमेदवार संजय खंबायते यांनी केला.

ते भाजपला साथ देणारवैजापूर : महाविकास आघाडी सरकारवर जनता नाराज होती. भाजप-शिवसेना युती करून एकत्र लढले. मात्र दोन्ही पक्षांचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. भाजप-सेनेला जनतेने सरकार स्थापण्यासाठी स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, हे जनतेला पटलेले नाही. त्यामुळेच शिवसेनेत बंडाळी निर्माण झाल्याने आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. या गटाची भाजपला साथ देण्याची तयारी आहे. वैजापूर तालुक्यात भाजपचे चांगले काम आहे. या कामाच्या बळावरच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा आगामी विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांनी स्पष्ट केले.

सिल्लोडमध्ये इच्छुकांची संख्या अधिकसिल्लोड : आगामी काळात निवडणुका झाल्या, तर भाजपकडून सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर हे प्रमुख उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. तसे पाहिले तर, या मतदार संघात अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत. त्यात प्रामुख्याने भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, प्रदेश चिटणीस इंद्रिस मुलतानी, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आदींचा समावेश आहे. यात कोण उमेदवार असेल, हे सांगणे अवघड आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ