पदाधिकारी, कर्मचाºयांतील वाद विकोपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:49 IST2017-09-17T00:49:55+5:302017-09-17T00:49:55+5:30
सत्ताधारी नगरसेवक व कर्मचाºयांमधील वाद विकोपाला गेला आहे.

पदाधिकारी, कर्मचाºयांतील वाद विकोपाला
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : नगरसेविकेच्या पतीने स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी अंबड नगरपालिकेतील कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले, तर सत्ताधारी नगरसेवकांनी स्वच्छता निरीक्षक लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक देत नाही. कर्तव्यात कसूर करतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्याधिकाºयांकडे निवेदनाव्दारे केली. या प्रकारामुळे सत्ताधारी नगरसेवक व कर्मचाºयांमधील वाद विकोपाला गेला आहे.
अंबड नगरपालिकेच्या भालचंद्र कुलकर्णी सभागृहात शुक्रवारी सकाळी स्वच्छता पंधरवडा अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, स्वच्छता व आरोग्य सभापती गंगाधर वराडे यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी हजर होते.
कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहामध्ये प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका सविता कुलकर्णी यांचे पती सौरभ कुलकर्णी यांनी मुख्याधिकारी भोंबे यांच्याकडे स्वच्छता निरीक्षक गोपाल चौधरी स्वच्छतेची कामे करत नसल्याबद्दल तक्रार केली. यावेळी स्वच्छता निरीक्षक चौधरी हे सुध्दा त्याठिकाणी हजर होते. यावरुन कुलकर्णी व चौधरी यांच्यात वाद झाला. सदरील घटना मुख्याधिकारी, नगरसेवक व पालिका कर्मचाºयांच्या समक्ष घडली, मुख्याधिकारी भोंबे यांनी मध्यस्थी करत वाद शांत केला. शनिवारी सकाळी पालिका कर्मचाºयांनी (पान २ वर)