मारहाण करून लुटल्याच्या परस्परविरोधी तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:02 IST2021-05-12T04:02:57+5:302021-05-12T04:02:57+5:30

तक्रारदार जॉन रमेश आव्हाड (२९, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) आणि अनोष प्रदीप अडागळे यांच्यात जुना वाद आहे. ९ मे ...

Conflicting complaints of beatings and robberies | मारहाण करून लुटल्याच्या परस्परविरोधी तक्रारी

मारहाण करून लुटल्याच्या परस्परविरोधी तक्रारी

तक्रारदार जॉन रमेश आव्हाड (२९, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) आणि अनोष प्रदीप अडागळे यांच्यात जुना वाद आहे. ९ मे रोजी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास भावसिंगपुरा परिसरातील अमेन चौकात आमने सामने आले. यावेळी न्यायालयात दाखल केलेली केस मागे घे, असे म्हणून अनोषने त्यांच्यासोबत भांडण सुरू केले. यातून त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी अडागळे याने खिशातील १ हजार ८०० रुपये काढून घेतले आणि त्याच्या साथीदाराने हात पकडून ठेवल्याचे आव्हाड यांनी तक्रारीत नमूद केले. अडागळे याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आव्हाड याने मारहाण करून खिशातील ३ हजार रुपये हिसकावून घेतल्याचे नमूद केले. छावणी पोलीस ठाण्यात याविषयी परस्परविरोधी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Web Title: Conflicting complaints of beatings and robberies