शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वास हेच स्त्रीचे खरे सौंदर्य

By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST

औरंगाबाद : सध्याच्या युगात स्त्रीने बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक विकास व वैचारिक प्रगतीला जास्त महत्त्व द्यायला हवे. वातावरण असुरक्षित होत असताना स्त्रियांनी स्वसंरक्षणात सक्षम होणे गरजेचे आहे,

औरंगाबाद : सध्याच्या युगात स्त्रीने बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक विकास व वैचारिक प्रगतीला जास्त महत्त्व द्यायला हवे. वातावरण असुरक्षित होत असताना स्त्रियांनी स्वसंरक्षणात सक्षम होणे गरजेचे आहे, अशी भावना ज्येष्ठ स्त्रीवादी विचारवंत विद्या बाळ यांनी व्यक्त केली. डॉ. सौ. इं. भा. पाठक महिला कला महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठवाडा लीगल अँड जनरल सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. जे. के. वासडीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, प्राचार्या डॉ. राजकुमारी गडकर, प्रा. दिलीप दोडके, प्रा. विदुल सुकळीकर, संसद सचिव गौरी जहागीरदार, शिल्पा पवार, दिशा वडमारे आदी उपस्थित होते. विद्या बाळ यांनी संसद सदस्यांना शपथ दिली. यावेळी बारावी बोर्ड व पदवी परीक्षेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात प्रीती जैन, अश्विनी अवचार, रूपाली चिते, अंकिता पवार, जयश्री हिवराळे, उषा नागवे, प्रियंका गुप्ता, धनश्री जामकर, सुभद्रा गुरुसहानी व करिष्मा पठाण यांचा समावेश होता.डॉ. बाळ म्हणाल्या, बाह्य सौंदर्य टिकाऊ नसून दिखाऊ आहे. जाहिरातींतून स्त्रीला केवळ शोभेची बाहुली या रूपात समोर आणले जाते. तेव्हा स्त्रीने माणूस म्हणून स्वत:ची प्रतिमा ठळक केली पाहिजे. महाराष्ट्रात समाजसुधारकांची मोठी प्रतिमा आहे. नव्या काळातील आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार करताना स्त्रीने आपले विचारही खुले व आधुनिक बनवावेत. आत्मसन्मान व आत्मविश्वास हेच खऱ्या सौंदर्याचे गमक आहे.ठाकूर म्हणाल्या, तरुण वयातच स्वत:च्या क्षमता ओळखून स्त्रियांनी प्रयत्नशील व्हावे. स्वत:ची बलस्थाने ओळखून त्यांचा विकास करावा. कुठल्याही विद्यापीठात न मिळणारी ‘माणुसकीची पदवी’ मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहा.वासडीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा. डॉ. पराग चौधरी, प्रा. अनिता अग्रवाल व डॉ. सुनीता बाजपाई यांनी संचालन केले.