लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आणि नेते मंडळीमध्ये श्रेय लाटण्यासाठी अनोखी स्पर्धा सुरु झाली. वाहून गेलेल्या या पुलाला पर्यटनस्थळाचे स्वरूप येत असून, प्रत्येकजण या पुलाला भेट देऊन दररोज वेगवेगळी घोषणा करीत असला तरी वाहतुकीचा प्रश्न मात्र सुटला नाही. या पावसाळ्यात दुसºयांदा हा पूल वाहून गेला. बीड शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक वेगवेगळ्या मार्गांनी वळविली असली तरी सर्वसामान्य जनता मात्र या त्रासास कमालीची वैतागली आहे. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यायी पुलाच्या डागडुजीचे श्रेय घेण्याची स्पर्धा आचंबित करणारी आहे.नवीन पुलाचे बांधकाम लवकर सुरू करा - पालकमंत्रीबिंदूसरा नदीवरील वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी वळण रस्ता सुरु करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य ठेवावा, असे निर्देश देत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेतला.नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवीन पुलाचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व आयआरबीच्या अधिकाºयांना दिले. यावेळी त्यांनी कामासंदर्भात अनेक सूचना केल्या.पंकजा मुंडे यांनी गुरुवारी मंत्रालयातील दालनातून जिल्हाधिकारी देवेंद्रसिंग, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि आयआरबीच्या संबंधित अधिकाºयांची बिंदूसरा नदीवरील पुलाचे बांधकाम आणि शहरातील वाहतुकीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेतली.बिंदूसरा नदीवरील वाहतूक बंद झाल्याने अवजड वाहतूक खंडेश्वरी मंदिराकडून तर हलके वाहने मोमीनपुरा भागातून सुरु करण्यात आली आहेत. हे रस्ते पावसामुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी चोवीस तास सतर्क रहावे, असे आदेश त्यांनी दिले.‘क्षीरसागर बंधूमुळेच पुलाचे काम अंतिम टप्प्यात’बिंदुसरा नदीवरील पूल असो किंवा बीड शहरातील अनेक महत्त्वकांक्षी योजना, ज्या पूर्ण करण्यासाठी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यामुळेच ती आता अंतिम टप्प्यात आली आहेत.या सर्व कामांचा शोध घेऊन विरोधक आता आयत्या पिठावर रेघोट्या मारु लागले आहेत हे न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही, असे नगरसेवक विष्णू वाघमारे, विनोद मुळूक, सय्यद सादेक, विकास जोगदंड, भीमराव वाघचौरे, प्रा. किशोर काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
श्रेयवादात पूल आणखी ‘खचला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:41 IST