शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागसेनवनातील इमारतींची दुरवस्था; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 13:56 IST

मराठवाड्यात जेव्हा उच्चशिक्षणाची कोणतीही सुविधा नव्हती. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत येऊन केवळ दलितच नव्हे, तर सर्व समाजाच्या मुलांसाठी मिलिंद महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली.

ठळक मुद्देसोसायटीतंर्गत कार्यकारी मंडळाचा वाद न्यायप्रविष्टअलीकडे इमारत देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने अनुदान देणे बंद केले आहे.

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित नागसेनवन परिसरातील महाविद्यालयांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. छताला तडे गेल्यामुळे पावसाळ्यात गळती लागली आहे. बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी महाआघाडी शासनाने आर्थिक मदतीचा हातभार लावावा, अशी समाजामधून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

मराठवाड्यात जेव्हा उच्चशिक्षणाची कोणतीही सुविधा नव्हती. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीऔरंगाबादेत येऊन केवळ दलितच नव्हे, तर सर्व समाजाच्या मुलांसाठी मिलिंद महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. नागसेनवन परिसरात मिलिंद विज्ञान महाविद्यालय, मिलिंद कला महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल या शैक्षणिक संस्था सुरु आहेत. या महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन गेलेले अनेक दिग्गज देशात विविध ठिकाणी महत्वाच्या हुद्यावर कार्यरत आहेत. 

अलीकडे इमारत देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने अनुदान देणे बंद केले आहे. सोसायटीतंर्गत कार्यकारी मंडळाचा वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे आजघडीला या महाविद्यालयांच्या इमारती तसेच वसतिगृहे मोडकळीस आले आहेत. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या छताला तडे गेले असून पोपडे कोसळल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळत आहे. लोकवर्गणीतून मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलला अलीकडेच रंगरंगोटी करण्यात आली आहे. अशीच अवस्था या परिसरातील अन्य महाविद्यालयांची आहे.  तथापि, बाबासाहेबांच्या स्मृती व आंबेडकरी संस्कार व चळवळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसराचे जतन करण्यासाठी महाआघाडी शासनाने आर्थिक मदत करावी, अशा प्रतिक्रिया समाजामधून व्यक्त होत आहेत.

इमारत दुरुस्तीसाठी शासनाने आर्थिक मदत करावीयासंदर्भात डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर साळवे म्हणाले की, नागसेनवन परिसरातील महाविद्यालयांच्या इमारती तसेच वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे. यापूर्वी भाजपचे सरकार सोडले, तर या परिसरात इमारत दुरुस्ती व वसतिगृहांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली होती. फंड नसल्यामुळे इमारतींची दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :Nagsen vanनागसेन वनAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर