महापरिनिर्वाणदिनी श्रामणेर शिबिराचा समारोप
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:07+5:302020-12-04T04:12:07+5:30
औरंगाबाद : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहिले होते. श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या ...

महापरिनिर्वाणदिनी श्रामणेर शिबिराचा समारोप
औरंगाबाद : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहिले होते. श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर टाकलेले हे आश्वासक पाऊल उचललेले आहे. महापरिनिर्वाणदिनी या शिबिराचा समारंभपूर्वक समारोप केला जाणार आहे.
या शिबिरामुळे श्रावस्ती बुद्ध विहाराचा परिसर लहान- थोर काषायवस्त्रधारी भिक्खूंनी गजबजला आहे. ‘ बुद्ध सरणं गच्छामि’चा स्वर वातावरणात निनादात आहे. समारोप समारंभास भदन्त बोधिपालो महाथेरो, भदन्त ज्ञानज्योती महाथेरो व भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे.
२७ नोव्हेंबर रोजी भदन्त आनंद महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहा दिवसीय श्रामणेर शिबिरास प्रारंभ झाला. राज्यभरातील विविध जवळपास ८० लहानथोरांनी श्रामणेर दीक्षा घेऊन तथागतांचा धम्म अनुसरण्याचा निर्धार केला आहे. भदन्त ज्ञानरक्षित थेरो यांच्यासह ज्येष्ठ भिक्खू बुद्ध, धम्म आणि संघासंबंधी मार्गदर्शन करीत आहेत. शहरातील बौद्ध उपासक, उपासिका आणि भिक्खू संघ शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या निमित्ताने श्रावस्ती बुद्ध विहारात रोज बुद्ध वंदना, धम्मदेसना, सामूहिक ध्यानसाधना, प्रवचन असे विविध कार्यक्रम सुरू आहेत. ६ डिसेंबर रोजी सामूहिक ध्यानसाधना, महापरित्राणपाठ, धम्मदेसना, कॅण्डल धम्म रॅली आयोजित केली आहे.
मैत्रेय चारिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी नागसेनवन परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला जात असे. मात्र, या वर्षी कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे हा कार्यक्रम श्रावस्ती विहार (साकेतनगर, भीमनगर- भावसिंगपुरा) येथे होत आहे. बौद्ध उपासक- उपासिकांनी कोरोना महामारीशी मुकालबला करण्यासाठी नियम व अटींची पूर्तता करून, या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.