एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:05 IST2021-03-04T04:05:11+5:302021-03-04T04:05:11+5:30
देशभरातील विविध महाविद्यालये व विद्यापीठातील ३०० प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला होता. या परिषदेचे उद्घाटन बामु विद्यापीठाचे वनस्पतिशास्त्र विभागाचे ...

एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप
देशभरातील विविध महाविद्यालये व विद्यापीठातील ३०० प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला होता. या परिषदेचे उद्घाटन बामु विद्यापीठाचे वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. बुरुंगळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ई. खडसन हे अध्यक्षस्थानी होते. वनस्पतीचे संवर्धन करताना जर आपण बुरशीचा वापर करून रोगमुक्त करण्याचा प्रयत्न केला तर ते वनस्पतीचे संरक्षण निसर्गास हानिकारक नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी डॉ. प्रमोद शर्मा, प्राध्यापक बनसोड, प्रा. व्यंकटेश लांब, प्रा. जे. एस. अंभोरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी सचिव डॉ. रूपाली बिरादार, समन्वयक डॉ. धम्मपाल भदे, प्रा. प्रभाकर डोंगरे, प्राचार्य वसंत माळी, जे. वाटुमल साधुबेला, प्रा. मीरा श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.