१८ हजारांची लाच घेणारा संगणक ऑपरेटर पोलिसांच्या जाळ्यात
By | Updated: November 28, 2020 04:15 IST2020-11-28T04:15:46+5:302020-11-28T04:15:46+5:30
गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील संगणक ऑपरेटर सतीश गिरम याने शेख सुलेमान शेख (वय ४३) यांच्या वाळूज येथील प्लॉटमधील मिळकत ...

१८ हजारांची लाच घेणारा संगणक ऑपरेटर पोलिसांच्या जाळ्यात
गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील संगणक ऑपरेटर सतीश गिरम याने शेख सुलेमान शेख (वय ४३) यांच्या वाळूज येथील प्लॉटमधील मिळकत क्रमांक ९५३ व ९५४ मधील नमुना ८ अ च्या उतारऱ्यातून गट नंबर काढून त्यात दुरुस्ती करून पुन्हा नवीन ८ अ चा उतारा मिळवून देण्यासाठी २१ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती १८ हजार रुपये घेण्याचे गिरम याने मान्य केले. मात्र, तक्रारदार शेख सुलेमान यांना सतीश रामनाथ गिरम याला पैसे देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे सुलेमान यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाळूज पोलीस ठाण्यासमोरील हॉटेलजवळ सापळा रचला आणि संगणक ऑपरेटर सतीश रामनाथ गिरम तक्रारदाराकडून १८ हजार रुपये ही लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला ताब्यात घेतले. लाच स्वीकारणाऱ्या गिरम याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, सुनील पाटील, अरुण उगले, रवींद्र आंबेकर, केवल गुसिंगे बागूल यांनी केली.