लाच घेताना संगणक ऑपरेटर अटकेत
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:17+5:302020-11-28T04:16:17+5:30
सतीश रामनाथ गिराम (३५) असे आरोपीचे नाव आहे, पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांच्या मालकीचे दोन भूखंड आहे. गाव नमुना ...

लाच घेताना संगणक ऑपरेटर अटकेत
सतीश रामनाथ गिराम (३५) असे आरोपीचे नाव आहे, पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांच्या मालकीचे दोन भूखंड आहे. गाव नमुना आठ अ च्या उतार यातून गट नंबर काढून टाकण्यासाठी आरोपी सतीश याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सतीश विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी लाचेच्या तक्रारीची पडताळणी केली. आज शुक्रवारी वाळूज पोलीस स्टेशन रोडवर आरोपी सतीशने तक्रार यांच्याकडून १८ हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप राजपूत आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.