तडजोड भोवली; दोन पोलिसांचे निलंबन
By Admin | Updated: March 1, 2016 00:47 IST2016-03-01T00:10:22+5:302016-03-01T00:47:32+5:30
बीड : भंगार घेऊन निघालेला ट्रक पकडून कारवाई टाळण्यासाठी ट्रक मालकासोबत तडजोड करणे शिवाजीनगर ठाण्यातील दोन पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले.

तडजोड भोवली; दोन पोलिसांचे निलंबन
बीड : भंगार घेऊन निघालेला ट्रक पकडून कारवाई टाळण्यासाठी ट्रक मालकासोबत तडजोड करणे शिवाजीनगर ठाण्यातील दोन पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले. सोमवारी अधीक्षक अनिल पारसकर यांनी त्यांच्यावर निलंबनाचा दंडुका उगारला.
पोलीस नाईक बाबासाहेब मिसाळ, कॉन्स्टेबल ए. पी. राख अशी त्यांची नावे आहेत. ते दोघेही शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. शनिवारी भंगार घेऊन जाणारा एक ट्रक त्यांनी ठाणे हद्दीत पकडला होता. गाडीची कागदपत्रे नसल्यामुळे त्यांनी दिवसभर ट्रक ठाण्यासमोर उभा करायला लावला. त्यानंतर ट्रक मालकाकडे पैशाची मागणीही केली. ट्रक मालकाने याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी अहवाल दिला. त्यावरून दोघांचेही तडकाफडकी निलंबन करण्यात आले.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)