तडजोडीने १०५७ प्रकरणे निकाली
By Admin | Updated: December 13, 2014 23:49 IST2014-12-13T23:49:26+5:302014-12-13T23:49:26+5:30
उदगीर/ देवणी : उदगीर व देवणी येथे शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल १०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़

तडजोडीने १०५७ प्रकरणे निकाली
उदगीर/ देवणी : उदगीर व देवणी येथे शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल १०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़
उदगीर येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघाच्या वतीने आयोजित लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एम़ पोतदार व वकील संघाचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी दिवाणी न्या़ व्ही़ बी़ नाशिककर, दिवाणी वरिष्ठ न्या़एस़जे़ नंदीमठ, दिवाणी न्या़ कनिष्ठ स्तरचे एस़एस़ बुद्रुक, एच़एस़ भुरे, के़जी़ सावंत, ए़बी़ मडके, तहसीलदार गजानन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ याप्रसंगी लोकअदालतीत मांडण्यात आलेल्या प्रकरणांपैैकी ९६६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला़ त्यात दिवाणी ९८, फौजदारी ४१, वादविवाद १२१ व इतर ५४७ प्रकरणांचा समावेश आहे़
देवणी न्यायालयात विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने आयोजित लोकअदालतीत ९१ प्रकरणे निकाली काढली़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या़ ए़आऱ शेंडगे होते़ अॅड़एसक़े़ मळभगे, अॅड़बी़एस़ शिंदे, अॅड़वाघमारे, सपोनि़ व्ही़ एम़ केंद्रे, गटविकास अधिकारी एस़ए़ अकेले यांनी पक्षकारांना मार्गदर्शन केले़ प्रास्ताविक अॅड़एस़एम़ बिराजदार यांनी केले़ आभार अॅड़ एम़बी़ बिरादार यांनी मानले़ यावेळी अॅड़डी़एऩ कांबळे, बी़एस़ कुडते, एस़पी़ कांबळे, भरत पाटील, महेश नागराळे, महेश पाटील, के़टी़ कांबळे, आऱएम़ शेख, अभिजीत माकणीकर, अनिरुद्ध राजे, रमेश जाधव, केसाळे, मनोहर भानुसे उपस्थित होते़ (वार्ताहर)