लोकअदालतीत ७७३ प्रकरणांत तडजोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:48 IST2017-09-11T00:48:29+5:302017-09-11T00:48:29+5:30
राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यातील विविध प्रकरणांत ५ कोटी १० लाख ७९ हजार ३०९ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली असून ७७३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली आहेत़

लोकअदालतीत ७७३ प्रकरणांत तडजोड
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यातील विविध प्रकरणांत ५ कोटी १० लाख ७९ हजार ३०९ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली असून ७७३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली आहेत़ त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एनआय अॅक्ट, मोटार वाहन अपघात, भूसंपादन आदींसह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, विविध बँका तसेच विद्युत विभागातील दाखल प्रकरणांचा समावेश होता़
राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशावरुन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्या़ एस़ पी़ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी लोकअदालत घेण्यात आली़
नांदेड अभिवक्ता संघाचे अॅड़मिलिंद एकताटे, उपाध्यक्ष अॅड़ जगजीवन भेदे, जिल्हा सरकारी वकील तसेच सर्व विधिज्ञ आणि विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल तसेच न्यायालयीन कर्मचाºयांची या लोकअदालतीला उपस्थिती होती़ विधि सेवा प्राधिकरणचे सचिव डी़ टी़ वसावे यांनी त्याबद्दल सर्वांचे आभार मानले़