'कामे वेळेत पूर्ण करा'
By Admin | Updated: November 17, 2014 12:20 IST2014-11-17T12:11:24+5:302014-11-17T12:20:58+5:30
जुन्या नांदेडातील मिल्लतनगर, ब्रह्मपुरी यासह शहरात सुरू असलेली घरकुलांची कामे महापालिकेने वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचना माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी केली.

'कामे वेळेत पूर्ण करा'
नांदेड : जुन्या नांदेडातील मिल्लतनगर, ब्रह्मपुरी यासह शहरात सुरू असलेली घरकुलांची कामे महापालिकेने वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचना माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी केली.
आ. सावंत यांनी शनिवारी मिल्लतनगर, ब्रह्मपुरी आदी भागातील घरकुल कामांना भेट देवून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी अनेक कामे अर्धवट असल्याची बाब लाभार्थ्यानी आ. सावंत यांच्यापुढे मांडली. महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांचीही उपस्थिती होती. आ. सावंत यांनी या भागातील घरकुलांसह शहरातील सर्वच भागात अर्धवट असलेली कामे मार्गी लावावीत अशी सूचना महापालिकेला केली. लाभार्थ्यांनीही ही कामे पूर्ण करण्यासाठी मनपाला आवश्यक ते सहकार्य करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मसूद खान, सिकंदर मौलाना, अन्सार खान, अय्युब पठाण, गौस इनामदार, खलील आदींची उपस्थिती होती. /(प्रतिनिधी)