टंचाईतील कामे वेळेत पूर्ण करा -गोरेगावकर
By Admin | Updated: August 27, 2014 23:38 IST2014-08-27T23:34:45+5:302014-08-27T23:38:40+5:30
सेनगाव : उपाययोजनेचे कामे सुरू करावीत अशा सूचना आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दिल्या.

टंचाईतील कामे वेळेत पूर्ण करा -गोरेगावकर
सेनगाव : पाणी व चाराटंचाई निवारण करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत कारवाई करीत प्रस्तावांचा निपटारा करावा, तातडीने उपाययोजनेचे कामे सुरू करावीत अशा सूचना आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सेनगाव येथील टंचाई आढावा बैठकीत दिल्या.
येथील बालाजी मंदिर सभागृहात पाणी व चाराटंचाई आढावा बैठक बुधवारी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस पंचायत समितीच्या सभापती शशिकलाबाई पाटील, उपसभापती लक्ष्मीबाई गडदे, तहसीलदार आर.के. मेडंके, गटविकास अधिकारी पंकज राठोड, पाणीपुरवठा अभियंता एंबडवार, बाजार समितीचे सभापती नारायणराव खेडेकर, जि.प. सदस्य द्वारकादास सारडा, चंद्रकांत हराळ, तालुका कृषी अधिकारी आर.बी. हरणे, आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यासह पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आदींची उपस्थिती होती.
यावेळी पाणीटंचाईचा आढावा घेताना विविध गावांचा अर्धवट पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा मुद्दा गाजला. सात ते आठ वर्षापासून पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण होत नसल्याबद्दल आ. गोरेगावकरांनी नाराजी व्यक्त केली.