छाननी प्रक्रिया पूर्ण
By Admin | Updated: November 3, 2016 01:29 IST2016-11-03T01:28:15+5:302016-11-03T01:29:37+5:30
बीड : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बुधवारी छानणीची प्रक्रिया पूर्ण झाली

छाननी प्रक्रिया पूर्ण
बीड : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बुधवारी छानणीची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी आक्षेप अर्जांवरही सुनावणी घेण्यात आली. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सहा ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी १९२ तर नगरसेवक पदासाठी २१३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, बीडमध्ये उमेदवारी अर्ज बाद झाल्यच्या अफवा सोशल मीडियावरून पसरल्या. त्यामुळे गोंधळ उडाला. इतरत्र या नामनिर्देशन पत्रांची बुधवारी छानणी प्रक्रिया शांततेत पार पडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ११ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून, त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)