‘नरेगा’ची ६ हजार कामे पूर्ण

By Admin | Updated: September 4, 2014 01:25 IST2014-09-04T00:55:50+5:302014-09-04T01:25:45+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात १ लाख ८७ हजार २४१ कुटुंब महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत असून, ५ लाख २ हजार ९४७ मजुरांची नोंदणी आहे.

Complete 6 thousand works of NREGA | ‘नरेगा’ची ६ हजार कामे पूर्ण

‘नरेगा’ची ६ हजार कामे पूर्ण

लातूर : लातूर जिल्ह्यात १ लाख ८७ हजार २४१ कुटुंब महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत असून, ५ लाख २ हजार ९४७ मजुरांची नोंदणी आहे. त्यापैकी आजघडीला १३ हजार १०१ मजुरांच्या हाताला काम आहे. योजना लागू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात ५ हजार ९२३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१४-१५ साठी ८.५५ लक्ष मनुष्यदिनाचे असून, त्यापैकी १०.१४ लक्ष मनुष्य दिन निर्मिती झाली आहे. जुलैअखेर ६५८ कामे सुरू करण्यात आली. त्यावर १३ हजार १०१ मजुरांना रोजगार देण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यात ७१, औसा तालुक्यात २०५, चाकूर तालुक्यात ४४, देवणी तालुक्यात ७८, जळकोट तालुक्यात ३४, लातूर ३६, निलंगा ८५, रेणापूर ६०, शिरूर अनंतपाळ ४३, उदगीर ११ अशी एकूण ६६७ कामे ग्रामपंचायतस्तरावर सुरू आहेत. या कामांवर अहमदपूर तालुक्यात ८१०, औसा तालुक्यात ९४१६, चाकूर तालुक्यात ५८८, देवणी तालुक्यात ९३६, जळकोट तालुक्यात ८६६, लातूर तालुक्यात ४६९, निलंगा तालुक्यात ९३५, रेणापूर तालुक्यात १३१९, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ५९३, उदगीर तालुक्यात ८४८ अशा एकूण १६ हजार ७८० मजुरांना गेल्या आठवड्यात काम देण्यात आले होते.
या मजुरांकडून रोपवाटिका, सिंचन विहिरी, पाणंदमुक्त रस्त्याचे काम करण्यात येत आहेत. शिवाय, काही कामे सुरूही आहेत. मागील आठवड्यात अहमदपूर तालुक्यात ४ कामांवर ५६, औसा तालुक्यात १० कामांवर ४१, जळकोट तालुक्यात ३७ कामांवर १५४, लातूर तालुक्यात ७ कामांवर ८४, निलंगा तालुक्यात १३ कामांवर ६५, रेणापूर तालुक्यात ४ कामांवर १३२, उदगीर तालुक्यात ५ कामांवर ४२ अशा एकूण ८० कामांवर ५७४ मजुरांची उपस्थिती होती.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जुलैअखेर ६५८ कामे सुरू करण्यात आली होती. ही कामेही प्रगतीपथावर असून, या कामासाठी प्रतीदिनी १३ हजार १०१ इतके मजूर उपस्थित होते.
४१ एप्रिल २००८ पासून लागू झालेल्या या योजनेत जिल्ह्यामध्ये १ लाख ८७ हजार २४१ कुटुंबांतील ५ लाख २ हजार ९४७ मजुरांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीकृत मजुरांना रोजगार हमी योजनेत काम देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. मनुष्य दिनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्नही प्रशासनाकडून केला जात आहे.

Web Title: Complete 6 thousand works of NREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.