जिल्ह्यात ५० टक्के पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:11 IST2016-07-03T23:59:33+5:302016-07-04T00:11:04+5:30
जालना : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीवर ५० टक्के पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या या परतूर आणि अंबड तालुक्यात झाल्या असून,

जिल्ह्यात ५० टक्के पेरण्या पूर्ण
जालना : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीवर ५० टक्के पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या या परतूर आणि अंबड तालुक्यात झाल्या असून, सर्वात कमी पेरणी जाफराबाद तालुक्यात झाली आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत १२४.१७ मि.मी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी जून महिन्याच्या सुरूवाती पासूनच पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना पेरण्या करण्यासाठी दिलासा दिला आहे. चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
तूर, कापूस लागवडीबरोबरच सोयाबीन, बाजरी, मूग, मका, उडीद या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या करून शेतकरी मोकळा झाला असला तरी अद्यापही काही तालुक्यांतील पेरण्या अपूर्णच आहेत. त्यांना पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा असल्याने त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्याचे दिसून येत आहे. चांगला पाऊस झाला तरच ग्रामणी भागात आशादायी चित्र असेल. अन्यथा चार वर्षांपासूनचे चित्र यंदाही कायम राहील, अशी शक्यता आहे.