१३ हजार घरकुले पूर्ण

By Admin | Updated: September 5, 2014 00:08 IST2014-09-04T23:59:38+5:302014-09-05T00:08:58+5:30

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १३ हजार घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़

Complete 13 thousand houses | १३ हजार घरकुले पूर्ण

१३ हजार घरकुले पूर्ण

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १३ हजार घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़
झोपडपट्टी मुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे़ मागील तीन वर्षापासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी जिव्हाळ्याची बनली आहे़ अनेक अडथळ्यांची मालिका पूर्ण करीत ही योजना उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करीत आहे़
शहरात एकूण २७ हजार ९८५ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ त्यापैकी सध्या १३ हजार घरकुले बांधून पूर्ण झाले आहेत़ तर १६ हजार २१० घरकुलांना मार्कआऊट दिले आहे़ २ हजार ५० लाभार्थी स्वत: बांधकाम करत असून त्यापैकी १ हजार १५० घरे पूर्ण झाले आहेत़ एनटीसी मिल एरियात ५ हजार १३२ घरकुलांचा प्रश्न अद्याप सुटला नाही़ योजनेचा कालावधी संपल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ मार्च २०१५ पर्यंत २२ हजार ८४९ घरकुले पूर्ण करण्याचा संकल्प मनपाचा आहे़ त्यामुळे राज्यात सर्वाधिक घरकुले बांधण्याचा विक्रम नांदेड महापालिका करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे़
सागंवी भागातील गौतमनगरात २ एकर जागेस शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून त्याठिकाणी सहाशे घरकुले बांधण्यात येणार आहेत़ रेल्वे स्टेशन परिसर, कॅनॉलरोड व गौतमनगरातील पुनर्वसित लाभार्थ्यांना याठिकाणी घरकुले देण्यात येणार आहेत़ गौतमनगरात १२ बहुमजली इमारतीत २१६ फ्लॅटचे काम पूर्ण झाले असून त्याठिकाणी लाभार्थी राहत आहेत़
ब्रह्मपुरी येथील कामे ठप्प
बीएसयुपी योजनेतंर्गत घरकुलांचे कामे जलदगतीने सुरू असतानाच ब्रह्मपुरी येथील घरकुलांचे कामे मात्र रेंगाळली आहेत़ तत्कालीन आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या बदलीनंतर याभागातील कामांची गती मंदावली आहे़ त्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत़ (प्रतिनिधी)
लालवाडीत १२ घरकुलांचे वाटप
रेल्वे विभागाकडून विकास कामे करताना लालवाडी भागातील रेल्वेलाईन लगत राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांची घरे काढण्यात आली होती़ त्यामुळे येथील नागरिकांच्या घरांचा प्रश्न समोर होता़ तेव्हा उघड्यावर पडलेल्या या कुटुंबांना महापालिकेने आधार दिला़ बीएसयुपी योजनेतंर्गत लालवाडी येथील १२ कुटुंबांना गुरूवारी घरे वाटप करण्यात आली़ यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दाटला़ महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते घरकुलांचे वाटप करण्यात आले़ यावेळी नगरसेविका अंजली गायकवाड, बाळासाहेब देशमुख, येवनकर, सरजितसिंघ गील, बीएसयुपी विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांची उपस्थिती होती़

Web Title: Complete 13 thousand houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.