महिलांचा तक्रारींचा पाढा

By Admin | Updated: August 18, 2014 00:58 IST2014-08-18T00:25:30+5:302014-08-18T00:58:05+5:30

जळगाव सपकाळ : केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी १५ आॅगस्ट रोजी जि.प. सदस्या रूख्मिणीताई सपकाळ

Complaints of women complaints | महिलांचा तक्रारींचा पाढा

महिलांचा तक्रारींचा पाढा





जळगाव सपकाळ : केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी १५ आॅगस्ट रोजी जि.प. सदस्या रूख्मिणीताई सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती दर्शवून. गावातील विविध समस्या ग्रामसभेसमोर मांडल्या.
जळगाव सपकाळ ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आयोजित ग्रामसभेला ग्रामसेवक ए.ई गायकवाड यांनी केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागाच्या विकासासाठी खास करून महिलांसाठी शिवणयंत्र, पिठगिरणी, शालेय मुलींसाठी सायकल वाटप, तसेच बचत गटांसाठी विविध व्यवसायासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे असे विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना गायकवाड यांनी दिली.
ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नावर महिलांनी गावातील मूलभूत प्रश्नांवर जोरदार चर्चा करून आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभेसमोर मांडले. आरोग्य उपकेंद्राला केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर्स उपलब्ध करून देणे, उपकेंद्राच्या स्वच्छतागृहाची घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने गावात मोठी दुर्गंधी पसरली.
त्यामुळे स्वच्छतागृह बंद करण्यात यावे, किंवा त्याची नियमित साफसपाई करण्यात यावी, गावातील झालेली रस्त्यांची दुरवस्था, नाल्याच्या सफाईस, ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे तो कित्येक दिवसांपासून उचल्या न गेल्याने मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले आहे.
दलित वस्ती सुधार योजनेची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावी, आणि गावात महिलासाठी स्वच्छतागृह बांधण्यात यावीत, अशा अनेक आपल्या जिव्हळ्याचा प्रश्न संदर्भात गावातील महिलांनी ग्रामसभेत आपल्या तक्रारीचा पाढा वाचला.
यावेळी जि.प.सदस्या रूख्मिणी सपकाळ, सरपंच उत्तमराव सोनवेणे, ग्रामसेवक गायकवाड यांनी महिलांचे सर्व म्हणणे ऐकून घेवून त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी निधीचे नियोजन करू, जिल्हा परिषदेकडून काही निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन जि.प.सदस्या सपकाळ यांनी उपस्थित महिलांना दिले.
यावेळी तारा सपकाळ शारदा सपकाळ, उषा साडवे, अश्विनी बेलेकर, आरोग्य सेवक एम.के.हिरेकर आदी महिलांची उपस्थिती होती. (वार्ताहर)



उपकेंद्राच्या आरोग्य सेविका कामटे यांनी पावसाळ्यातील आजार व स्वच्छता या विषयी उपस्थित महिलांना महिती दिली. आठवड्यातून एक दिवस तरी सर्वांनी कोरडा दिवस म्हणून पाळावा. बारा आठवड्याच्या आत गदोदर माता नोंदणी करावी अशी माहिती दिली. अंगणवाडी सेविका मीना सोनवणे यांनी बालकांना दररोज अंगणवाडीत पाठविण्याचे आवाहन उपस्थित महिलांना केले.

Web Title: Complaints of women complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.