नोकरीच्या आमिषाने फसविल्याची तक्रार !

By Admin | Updated: December 22, 2014 23:35 IST2014-12-22T23:35:37+5:302014-12-22T23:35:37+5:30

बीड : नोकरी लावण्याच्या आमिषाने एका तरूणाने बेरोजगारांकडून पैसे उकळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी शिक्षण विभागाकडे केली. त्यावरून गोंधळ निर्माण झाला.

Complaint of fraud by job bait! | नोकरीच्या आमिषाने फसविल्याची तक्रार !

नोकरीच्या आमिषाने फसविल्याची तक्रार !


बीड : नोकरी लावण्याच्या आमिषाने एका तरूणाने बेरोजगारांकडून पैसे उकळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी शिक्षण विभागाकडे केली. त्यावरून गोंधळ निर्माण झाला.
पाटोदा तालुक्यातील एका तरूणाने संगणक शिक्षक पदावर नोकरी मिळवून देतो असे सांगून बेरोजगारांकडून ३० हजार रुपयांप्रमाणे लाखो रुपये उकळले, अशी तक्रार लोकशासनचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब खिंडकर यांनी केली. संबंधित तरुणासह ते माध्यमिक शिक्षण विभागात सायंकाळी पाच वाजता पोहोचले. मात्र, तेथे शिक्षणाधिकारी लता सानप नव्हत्या. त्यानंतर सदरील तरुणाने आपला कंपनीशी काही संबंध नाही तर स्वत:चीच फसवणूक झाल्याचा पलटवार केला. यावेळी तासभर तेथे गोंधळ सुरु होता. त्यानंतर इतर तरूणांना तेथे पाचारण करून संबंधित तरुण तेथून निघून गेला. दरम्यान, दादासाहेब खिंडकर हे फसवणूक झालेल्या तरुणांसह रात्री आठ वाजता बीड ग्रामीण ठाण्यात पोहोचले होते. संबंधित तरुणाकडे आढळलेल्या बेरोजगारांच्या याद्या व इतर दस्ताऐवज खिंडकर यांनी पोलिसांकडे सादर केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
त्यांनी पोलिसांत जावे!
सीईओ नामदेव ननावरे म्हणाले, अशा प्रकारे फसवणूक झाली असली तरी त्याच्याशी आमचा संबंध नाही. फसवणूक झालेल्यांनी पोलिसांत जावे. (प्रतिनिधी)
संगणक शिक्षक पदाची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणांकडून पैसे वसूल करण्याची टोळीच सक्रिय असल्याचा संशय या सर्व प्रकारानंतर व्यक्त केला जात आहे. या टोळीचा मास्टरमार्इंड एक शिक्षकच असल्याची चर्चा जि.प. आवारात होती.

Web Title: Complaint of fraud by job bait!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.