संस्थाचालकाने फसविल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:31 IST2016-07-10T23:46:13+5:302016-07-11T00:31:36+5:30
बीड : खासगी शिक्षण संस्थेत बनावट स्वाक्षरी वापरुन परस्पर वेतन हडप केल्याची तक्रार दोन शिक्षकांनी शनिवारी पोलिसांत केली आहे. हा प्रकार तागडगाव (ता. शिरुर) येथे रविवारी समोर आला आहे.

संस्थाचालकाने फसविल्याची तक्रार
बीड : खासगी शिक्षण संस्थेत बनावट स्वाक्षरी वापरुन परस्पर वेतन हडप केल्याची तक्रार दोन शिक्षकांनी शनिवारी पोलिसांत केली आहे. हा प्रकार तागडगाव (ता. शिरुर) येथे रविवारी समोर आला आहे.
तागडगाव येथील कै. सुभद्राबाई बहुद्देशिय महिला सेवाभावी संस्थचे गावात माध्यमिक विद्यालय आहे. या संस्थेत परमेश्वर सोनवणे व चरणराज वाघमारे हे अनुक्रमे २००८ व २००९ पासून शिक्षक म्हणून रुजू झाले. नियुक्तीवेळी संस्थेने त्यांच्याकडून संस्था देणगीपोटी अनुक्रमे पाच लाख व चार लाख रुपये वसूल केले. नियुक्तीनंतर त्यांना वेतनही दिले नाही. ११ सप्टेंबर २०१३ रोजी दोघांनाही नोकरीतून काढले. याबाबत शिक्षकांनी औरंगाबाद येथील शाळा न्यायधिकरण येथे दाद मागितली. वेतनाची याचिकाही न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान, संस्था सचिव सुलोचना सर्जेराव सानप व मुख्याध्यापकांवर शिक्षकांनी गंभीर आरोप केले आहेत. स्वाक्षऱ्या स्कॅन करुन पगारपत्रकावर दाखवून परस्पर वेतन उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पगार वाटप रजिस्टरची चौकशी करावी, अशी मागणीही वाघमारे, सोनवणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, शिरुर ठाणे व जि.प. शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणे उचित नाही; परंतु शिक्षकांच्या तक्रारीत तथ्य नाही. आरोप खोटे आहेत
- सुलोचना सर्जेराव सानप
सचिव, कै. सुभद्राबाई बहुद्देशीय महिला सेवाभावी संस्था.