तहसीलदारांची बीडीओंविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:30 IST2017-10-04T00:30:48+5:302017-10-04T00:30:48+5:30
ग्रामपंचायत कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर यांनी बीडीओ मोहन अभंगे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ३ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे़

तहसीलदारांची बीडीओंविरुद्ध तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : ग्रामपंचायत कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर यांनी बीडीओ मोहन अभंगे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ३ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे़
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोनपेठ तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे़ यासाठी ७ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे़ या कामासाठी गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांना एका आदेशाद्वारे एम़एम़ २२ डी़ ७२१२ हे शासकीय वाहन अधिगृहित करण्यासाठी आदेश देण्यात आले होते़; परंतु, अभंगे यांनी हे आदेश घेण्यास नकार दिला़ तसेच आवक, जावक लिपिक यांनाही आदेश घेण्यास मज्जाव केला़ त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी वाहन उपलब्ध झाले नाही़ निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या कामात गटविकास अधिकारी अभंगे यांनी जाणुनबुजून हलगर्जीपणा केला आहे़, अशी तक्रार तहसीलदार जीवराज डापकर यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती़
दरम्यान, तालुक्यातील दोन वरिष्ठ अधिकाºयांमध्येच समन्वय नसल्याचे या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पंचायत समिती व महसूल विभागातील कर्मचारी अस्वस्थ झाले असून पोलीस विभागातील कर्मचारी मात्र कात्रीत सापडले आहेत.