नवरदेवाविरुद्ध प्रेयसीची बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:58 IST2017-06-18T00:54:55+5:302017-06-18T00:58:12+5:30

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून गर्लफे्रंडशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न करण्यासाठी तयार झालेल्या नवरदेवाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

Complaint against rape of a girl against Navrupa | नवरदेवाविरुद्ध प्रेयसीची बलात्काराची तक्रार

नवरदेवाविरुद्ध प्रेयसीची बलात्काराची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून गर्लफे्रंडशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न करण्यासाठी हळद लावून तयार झालेल्या नवरदेवाविरुद्ध सिटीचौक ठाण्यात शुक्रवारी रात्री बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी पसार झाला.
कमलेश बाहुबली गंगवाल (रा. सिंधी कॉलनी), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक डी.एस. सिनगारे यांनी सांगितले की, पीडिता ही फाजलपुऱ्यात राहते, तर आरोपी सिंधी कॉलनीत. दोघेही पदवीधर असून, त्यांच्यात महाविद्यालयात शिकत असल्यापासून ओळख आहे. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोन वर्षांपासून त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी कमलेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. दोन
वर्षांपासून त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कमलेशच्या घरातील मंडळींनी त्याचे लग्न दुसऱ्याच एका मुलीसोबत निश्चित केले. ही बाब पीडितेला समजल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला. त्याने घरातील मंडळींना समजावून सांगतो, असे सांगून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, १९ जून रोजी त्याच्या लग्नाची तारीख ठरल्याचे पीडितेला समजले. यामुळे तिने त्याला पुन्हा गाठले आणि लग्नाच्या आमिषाने तू शारीरिक संबंध प्रस्थापित करून विश्वासघात केल्याचा जाब विचारला. तेव्हा तुला काय करायचे ते कर, मी लग्न करणार असल्याचे त्याने तिला स्पष्ट सांगितले. शिवाय त्यास समजावण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या आईलाही त्याने धमकावले. या प्रकरणी १६ जून रोजी रात्री पीडितेने फिर्याद नोंदविली.

Web Title: Complaint against rape of a girl against Navrupa