हवामान खात्याच्या विरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल

By Admin | Updated: July 14, 2017 16:48 IST2017-07-14T16:48:15+5:302017-07-14T16:48:15+5:30

हवामान खात्याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा अशी विनंती करणारा तक्रार अर्ज दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

In the complaint against the Meteorological Department, the police filed a complaint of cheating | हवामान खात्याच्या विरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल

हवामान खात्याच्या विरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल

ऑनलाईन लोकमत

बीड : पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. हा फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात माझी फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा अशी विनंती करणारा तक्रार अर्ज आज माजलगाव तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी  गंगाभीषण थावरे यांनी  दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.

हवामान खात्याने एप्रिल-मे मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करत यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे जाहीर केले होते. यावर विसंबून शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात पेरण्या केल्या. प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यानंतरही येत्या 48 तासात पाऊस येणार 72 तासात येणार असे सांगत हवामान खाते शेतकर्‍यांना फसवत राहिले. यामागे बियाणे निर्माते ,खत आणि औषधी कंपन्यांचे भारतीय हवामान खात्यासोबत आर्थिक हितसंबंध असावेत अशी शक्यता असल्याचेहि  तक्रारीत म्हटले आहे. 
 
पेराण्यानंतर पावासाने पाठ फिरवलेल्याने त्रस्त शेतक-याची ही तक्रार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. या तक्रारीवर दोन दिवसात कारवाई करून गुन्हा दाखल केला गेला नाही तर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे. कायदेशीर बाबी तपासून अर्जावर पुढील निर्णय घेणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
 

Web Title: In the complaint against the Meteorological Department, the police filed a complaint of cheating