मराठा समाजाबद्दल अपशब्द, पोकर्णांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:00 IST2017-08-04T00:00:32+5:302017-08-04T00:00:32+5:30
मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मराठा समाजाबद्दल अपशब्द, पोकर्णांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी शहरात एक बैठक घेण्यात आली़ बैठकीनंतर मराठा समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले़ पोकर्णा यांच्याविरूध्द कारवाई करण्याची मागणी करुन गुन्हा दाखल होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली़ जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची सूचना दाखल केली़ त्यानुसार शिवव्याख्याते सोपान कदम यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात कलम २९८ (अ) आणि ५०५ (२)नुसार करण्यात आला़ दरम्यान, यासंदर्भात पोकर्णा यांची बाजू घेण्यासाठी त्यांना संपर्क साधण्याचा दोन वेळा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मोबाईल उचलाल नाही.