शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:33 IST

जवाहरनगर पोलिसांवर पीडितेचा गंभीर आरोप; महिलांबाबत निष्काळजीपणाचा दुसऱ्यांदा प्रकार समोर

छत्रपती संभाजीनगर : एका बड्या नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय पीडितेला जवाहरनगर पोलिसांनी तासभर ठाण्यात बसवून ठेवले. तर, तिला बेदम मारहाण करून जखमी केलेल्या आरोपींना अधिकाऱ्याच्या दालनात बसवून चहा पाजून सोडून दिल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे.

२४ वर्षीय पीडितेसोबत श्रीकांत तेजराव लहाने (३०, रा. भानुदासनगर) याने संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिला होता. त्यामुळे श्रीकांतवर छावणी ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा मागे घेण्यासाठी श्रीकांतने तिच्यासोबत १० नोव्हेंबर रोजी विद्यापीठ परिसरात लग्न केले. मात्र, घरी नांदवण्यास नकार देत हॉस्टेलवर ठेवले. २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता पीडितेने थेट श्रीकांतचे घर गाठले. त्याच्या कुटुंबाने मात्र तिला घरात घेण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत त्यांना ठाण्यात येण्याची सूचना केली. पीडिता रिक्षाने ठाण्यात जाताना भानुदासनगरजवळ तिची रिक्षा अडवून कल्याण तेजराव लहाने व अमृता अकोलकर हिने मारहाण करून गंभीर जखमी केले. स्थानिकांनी मध्यस्थी करत पीडितेची सुटका केली. पहाटे ३ वाजता अमृता व कल्याणवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला चहापाणी, पीडितेला हिडीसफिडीसपीडितेने यासंदर्भात रात्रीतूनच शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांना कॉल करून मदत मागितली. त्यात तिने ठाण्यात पोलिसांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीचा धक्कादायक उलगडा केला. ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मला मारहाण करणाऱ्या आरोपींना दालनात नेऊन चहापाणी करून सोडून दिले. आरोपी माझ्यासमाेर हसत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पोलिस उपायुक्त, निरीक्षक ‘नॉट रिचेबल’या घटनेबाबत बाजू समजून घेण्यासाठी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी प्रतिसाद दिला नाही. श्रीकांत हा एका बड्या नेत्याचा नातेवाईक असल्याचे पीडितेने सांगितले. विशेष म्हणजे, जवाहरनगर ठाण्यातील अधिकाऱ्यांनी यापूर्वीही एका बलात्कारातील अल्पवयीन पीडितेला अशीच वागणूक दिली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस