बियाणे न उगवल्याची तक्रार
By Admin | Updated: July 30, 2014 00:47 IST2014-07-29T23:48:26+5:302014-07-30T00:47:21+5:30
पालम : तालुक्यातील आरखेड व उमरथडी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु बियाणांची उगवण न झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

बियाणे न उगवल्याची तक्रार
पालम : तालुक्यातील आरखेड व उमरथडी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु बियाणांची उगवण न झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामामध्ये सोयबीन पिकाची पेरणी करण्यासाठी सोया लक्ष्मी या कंपनीचे बियाणे विकत घेतले होते. यावर्षी पेरणीसाठी बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर केला होता; परंतु घरचे बियाणे उगवण न झाल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे नामांकित कंपनीचे बियाणे घेतल्यास चांगली उगवण होईल, या आशेने महागडी बियाणे खरेदी करून पेरणी केले; परंतु या कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही कंपनीने दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सोपान दुधाटे, आनंता दुधाटे, बापूराव दुधाटे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)