कार्यकर्त्यांसाठी स्पर्धा !
By Admin | Updated: October 5, 2014 00:48 IST2014-10-05T00:38:50+5:302014-10-05T00:48:47+5:30
आशपाक पठाण , लातूर विधानसभा निवडणुकीचा राजकीय आखाडा तापत आहे़ राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर लावला आहे़ निवडणुका स्वबळावर असल्याने सर्वच उमेदवारांना ‘स्व’बळावरच कार्यकर्ते

कार्यकर्त्यांसाठी स्पर्धा !
आशपाक पठाण , लातूर
विधानसभा निवडणुकीचा राजकीय आखाडा तापत आहे़ राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर लावला आहे़ निवडणुका स्वबळावर असल्याने सर्वच उमेदवारांना ‘स्व’बळावरच कार्यकर्ते टिकवावे लागत आहेत़ शिवाय, प्रभाग - बुथनिहाय विश्वासू सुशिक्षित कार्यकर्ते मिळविण्यासाठी नेत्यांची दमछाक होत आहे़ नवा कार्यकर्ता सहजपणे जुळत नसल्याने ‘रोजंदारी’च्या विषयाला हात घातला जात आहे़ पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मागणी वाढली़ मात्र, चांगले कार्यकर्ते मिळविण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे़
लातूर जिल्ह्यात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांचीही मोठी गर्दी आहे़ दसऱ्याला सिमोल्लंघन करीत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे़ सभा, रॅली व कॉर्नर बैठकांचे नियोजन करणाऱ्या नेत्यांना ‘विश्वासू’ शोधावे लागत आहे़
पाऊस नसल्याने लातुरात बांधकामाचे काम थंडावले आहे़ परिणामी, हजारो महिला, पुरूष मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना विधानसभेची निवडणूक जणू मजुरांच्या हाताला काम घेऊन आली आहे, अशीच परिस्थिती आहे़ कार्यकर्त्यांचे जाळे अपुरे असणाऱ्या उमेदवारांना सभा व रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी रोजंदारीवर कार्यकर्ते मागवावे लागत आहेत़
प्रभाग व बुथनिहाय चांगले कार्यकर्ते शोधले जात आहेत़ कार्यकर्ते शोधत असताना तो स्थानिकचा रहिवाशी असावा, मतदार यादीतील मतदारांचे नावे वाचता यावीत, संबंधित मतदारांचे घर, पत्ता शोधून त्यांच्यापर्यंत पोहचू शकणाऱ्या सुशिक्षित कार्यकर्त्यांसाठी चांगले दिवस आले आहेत़ त्यातही त्या प्रभागातील वजनदार नेत्यांची शिफारस, विश्वास असल्यास त्यांना प्राधान्य दिले जात आहे़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे़ दिवस कमी असल्याने सर्वांचीच धावाधाव सुरू आहे़ दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा भाव वाढत आहे़
गंजगोलाईचा आधाऱ़़
४लातूर शहरातील शिवाजी चौक, गंजगोलाई, नांदेड नाका, विवेकानंद चौक, जुना रेणापूर नाका आदी ठिकाणी मजुरांचा थांबा आहे़ शिवाजी चौकात दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांची दमछाक होते़ आठवडाभरापासून मजुरांची संख्या घटली आहे़ प्रचारसभा व रॅलीसाठी मजुरांना रोजगार मिळाला आहे़ दिवाळीच्या तोंडावर निवडणुकीत ‘दिवाळी’ होत असल्याने सध्या तरी दिवाळीची उत्सुकता कमी अन् मतदानाची उत्सुकता अधिक लागली आहे़