पोलीस दलात लागली कारवायांसाठी स्पर्धा

By Admin | Updated: June 8, 2017 00:30 IST2017-06-08T00:24:33+5:302017-06-08T00:30:08+5:30

नांदेड: स्थागुशा आणि विशेष पथकात कारवायांसाठी आता चांगली स्पर्धा लागली आहे़

The competition for activities in the police force | पोलीस दलात लागली कारवायांसाठी स्पर्धा

पोलीस दलात लागली कारवायांसाठी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पोलीस अधीक्षक किशोरचंद्र मिना यांच्या विशेष पथकाचे जिल्हाभरात धाडसत्र सुरु झाले असताना, आता स्थानिक गुन्हे शाखेलाही जाग आली़ स्थागुशाने गेल्या दोन दिवसांपासून छोट्या-मोठ्या कारवाया केल्या आहेत़ त्यामुळे स्थागुशा आणि विशेष पथकात कारवायांसाठी आता चांगली स्पर्धा लागली आहे़
मिना यांनी हदगावचे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांची नियुक्ती करीत त्यांना विशेष पथकाचा प्रमुख केले़ अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करण्याचे या पथकाला आदेश देण्यात आले होते़ त्यानंतर चिंचोलकर यांच्या पथकाने जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत धडाकेबाज कामगिरी केली आहे़ गुटखा विक्रेते, दारु विक्रेते, अवैध वाळू उपसा करणारे यासह अनेक जुगार अड्ड्यावर धाडी मारुन अवैध धंदे वाल्यांच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे़ दोन दिवसांपूर्वी माहूर तालुक्यात एकाच दिवशी चार ठिकाणी धाडी मारुन १३ लाखांचा माल जप्त केला होता़ जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात त्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा बोलबाला सुरु आहे़ त्यामुळे मधल्या काळात काहीशी सुस्त झालेली स्थागुशाही कामाला लागली आहे़ दोन्ही शाखांमधील स्पर्धा नांदेड जिल्ह्यातून गुन्हेगारी हद्दपार करण्यास लाभदायकच ठरणार आहे़

Web Title: The competition for activities in the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.