हगणदारीमुक्तीसाठी सामुहिक प्रयत्न
By Admin | Updated: May 11, 2015 00:29 IST2015-05-11T00:14:01+5:302015-05-11T00:29:58+5:30
जालना : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम अंतर्गत जालना जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असून, साधन व्यक्तींनी आपापल्या

हगणदारीमुक्तीसाठी सामुहिक प्रयत्न
जालना : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम अंतर्गत जालना जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असून, साधन व्यक्तींनी आपापल्या भागात स्वच्छ भारत मिशनचे काम केल्यास जालना जिल्हा राज्यातील पहिला हगणदारीमुक्त होईल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय साधन व्यक्तींच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे केंद्रीय उपसचिव डॉ. निपूण विनायक, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह, दिल्ली येथील विकास श्रीवास्तव, अप्पर पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, बी.डी. पटेल, नितीन थाडे, पद्माकर केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोणीकर यांनी यावेळी स्वच्छता अभियानात काम कसे करावे, हगणदारीमुक्त गाव करताना काय काळजी घेतली पाहिजे, गतीमान प्रशासन झाल्यास लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळेल व लवकर जिल्हा हगदणदारीमुक्त करण्यासाठी सर्व विभागाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यशाळेत डॉ. निपूण विनायक यांनी उपस्थित साधन व्यक्तींना हागणदारीमुक्तीबद्दल विविध प्रश्न विचारले. त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थितांनीही उत्स्फुर्तपणे उत्तरे देऊन प्रतिसाद दिला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. पटेल (पा.व.व्य.) यांनी केले. संचालन भगवान तायड यांनी तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी आभार व्यक्त केले.
कार्यशाळेस गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, भास्कर कुलकर्णी, सोळुंके, सुधीर ठोंबरे, दार्इंगडे, बनसोड यांची उपस्थिती होती.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी नम्रता गोस्वामी, भगवान तायड, संजय डोंगरदिवे, सुहास गवळी, हिमांशु कुलकर्णी, जय राठोड, धीरज पाटोळे, संतोष जाधव, श्रीकांत चित्राल, सुशय जाधव, राम चव्हाळ यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
याचा सर्वात जास्त धोका लहान मुलांना असतो. दररोज हजारो मुले देशात डायरिया, हगवणीमुक्त भारतात हे सर्व थांबवणे किती आवश्यक आहे, या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक तालुकानिहाय प्रतिनिधींची साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली.
४अशा २४० साधन व्यक्तीची कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. या साधन व्यक्तींमार्फत आगामी काळात जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
स्वच्छता अभियानात डॉ. निपूण विनायक यांनी जे नावलौकिक मिळविले आहे, तो वारसा कायम ठेवून अभियानात उत्कृष्ठपणे काम करू, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना ग्रामसेवक हा या योेजनेचा कणा असून, त्यांना व इतरही विभागांना एक एक करून स्वच्छता अभियानास गती प्राप्त करून देऊ असा विश्वास दिला. कार्यशाळा दोन विभागात संपन्न झाली. प्रात्यक्षिक व मार्गदर्शन असे त्याचे स्वरूप होते. साधन व्यक्तीमध्ये जि.प.सदस्य, रामेश्वर सोनवणे, एल.के. दळवी, पंचायत समिती सदस्य, ब्रह्मा वाघ, पंडितराव भुतेकर, लहुराव देशमुख, संतोषराव मोहिते, राजेश बोराडे, मनिष श्रीवास्तव, संतोष लोखंडे यांनी विविध प्रकारचे अनुभव कथन केले.