पोलिस अन् पाटलांचा संवाद झाला कमी

By Admin | Updated: August 9, 2014 00:37 IST2014-08-08T23:35:37+5:302014-08-09T00:37:29+5:30

त्यामुळे पोलिस आणि पोलिस पाटील यांच्यातील संवाद कमी झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) येथील

The communication between the police and the police was reduced | पोलिस अन् पाटलांचा संवाद झाला कमी

पोलिस अन् पाटलांचा संवाद झाला कमी



. त्यामुळे पोलिस आणि पोलिस पाटील यांच्यातील संवाद कमी झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.
उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) येथील पोलिस ठाणे हे फार जुने आहे. जळकोट तालुक्याची निर्मिती होण्यापूर्वी जळकोटमधील गावांचा कारभार याच पोलिस ठाण्याअंतर्गत करण्यात येत होता. जळकोटची निर्मिती झाली आणि वाढवणा पोलिस ठाण्याचा भारही हलका झाला. आजघडीला या पोलिस ठाण्याअंतर्गत चार बीट आहेत.
वाढवणा बीट अंतर्गत वाढवणा (खु.), सुकणी, लाळी (बु.), बेळसांगवी, डांगेवाडी, डाऊळ, आडोळवाडी, मन्ना उमरगा, किनी, हंडरगुळी बीट अंतर्गत हाळी, वडगाव, शेळगाव, राचन्नावाडी, संगाचीवाडी, चिमाचीवाडी, मोर्तळवाडी, वंजारवाडी, रुद्रवाडी, चिद्रेवाडी, चवळेवाडी, नळगीर बीटमध्ये चोंडी, सुमठाणा, देऊळवाडी, टाकळी, वागदरी, गुट्टेवाडी, मोर्तळवाडी, कासराळ, तर डोंगरशेळकी बीट अंतर्गत गुडसूर, नावंदी, खेर्डा, कल्लूर, एकुर्गा, हिप्परगा, मांजरी, डोंगरशेळकी तांडा या गावांचा समावेश आहे. ४० गावांपैकी दहा गावांतील पोलिस पाटील पद अद्यापही रिक्त आहे. या सर्व गावांतील पोलिस पाटलांचे मानधन पूर्वी पोलिस ठाण्यातून वाटप करण्यात येत होते. त्यामुळे पोलिस पाटलांच्या अडीअडचणी, गावातील इत्यंभूत खबरबात, शासकीय कामातील अडचणी याचा ऊहापोह होत असे.
त्यामुळे पोलिसांना गावची इत्यंभूत माहिती सहजरित्या मिळत असे. प्रशासनाने आता पोलिस पाटलांचे मानधन त्यांच्या खात्यावर आॅनलाईन जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिस पाटील आणि पोलिस ठाणे यांच्यातील संवाद कमी झाला आहे. त्यामुळे गावागावातील माहिती अल्प प्रमाणात पोलिसांना मिळत असल्याचे दिसून येत आहे़

Web Title: The communication between the police and the police was reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.