‘पारदर्शक कारभारासाठी कटीबद्ध’
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:05+5:302016-04-03T03:50:37+5:30
आष्टी : अगोदरच्या सरकारने केवळ घोषणांचा पाऊस पाडून तिजोरी रिकामी केली; परंतु भाजप-सेनेच्या सरकारने घोषणांसोबत निधी खेचून आणला

‘पारदर्शक कारभारासाठी कटीबद्ध’
आष्टी : अगोदरच्या सरकारने केवळ घोषणांचा पाऊस पाडून तिजोरी रिकामी केली; परंतु भाजप-सेनेच्या सरकारने घोषणांसोबत निधी खेचून आणला व त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे शनिवारी केले.
धामणगाव येथे केंद्रीय रस्ते विकासनिधी अंतर्गत ५६ कोटी रूपयांच्या रस्ता कामाच्या प्रारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. भीमराव धोंडे हे होते. माजी आ. साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, बापूराव धोंडे, उध्दव दरेकर, रवींद्र ढोबळे, विजय गोल्हार, पं. स. सभापती प्रियांका सांवत, एस. आर. ठोंबरे, अॅड. सुधीर घुमरे, डॉ. मधुसूदन खेडकर, रामराव खेडकर, दशरथ वनवे यांची उपस्थिती होती.
शासन योजना पारदर्शकपणे राबविण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगून, पालकमंत्री मुंडे म्हणाल्या, गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी - गुत्तेदारांची गय केली जाणार नाही. जलयुक्त शिवारमधून चांगली कामे झाली. त्याचे चांगले परिणाम पावसाळ्यात दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली. कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)