खर्चावर आयोगाची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:47 IST2017-09-12T00:47:32+5:302017-09-12T00:47:32+5:30
महापालिकेची निवडणूक ११ आॅक्टोबर रोजी होणार असून निवडणुकीसंदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त हे १३ सप्टेंबर रोजी नांदेडात येणार आहेत़ दरम्यान, निवडणुकीच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे़

खर्चावर आयोगाची करडी नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिकेची निवडणूक ११ आॅक्टोबर रोजी होणार असून निवडणुकीसंदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त हे १३ सप्टेंबर रोजी नांदेडात येणार आहेत़ दरम्यान, निवडणुकीच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे़
महापालिका निवडणुकीची प्रशासकीयस्तरावर तयारी सुरू असून मागील आठवड्यात मनपा अधिकाºयांच्या विविध विभागावर नियुक्त्या करण्यात आल्या़ निवडणुकीच्या नियोजनासाठी मनपा आयक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी बैठक घेतली़ बैठकीत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकाºयांना निवडणुकीसंदर्भातील सर्व महत्त्वाचे शासन निर्णय, निवडणुकीसंदर्भातील मनपा कायद्यातील नियम व महत्त्वाचे भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी देण्यात आली़ सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी आपापसात समन्वय ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या़
लवकरच निवडणुकीसाठी मनपास्तरीय समन्वय समितीची स्थापना होणार आहे़ ज्यांना निवडणुकीचे उमदेवारी अर्ज आॅनलाईन भरायचे असतील, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील सर्व इंटरनेट कॅफेधारकांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ राज्याचे निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे़ या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगाने चार आयकर अधिकाºयांच्या नेमणुका केल्या आहेत़ हे अधिकारी उमेदवारांकडून निवडणुकीमध्ये केल्या जाणाºया खर्चावर नजर ठेवतील़