करमाड रेल्वे अपघाताची ट्रायल घेतली; कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:49 AM2020-05-11T11:49:24+5:302020-05-11T11:50:18+5:30

चौकशीसाठी जालना ते औरंगाबाद दरम्यानचे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले.

Commissioner of Railway Safety conducts trial of Karmad accident; Inquiry of Jalna-Aurangabad employees started | करमाड रेल्वे अपघाताची ट्रायल घेतली; कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून चौकशी सुरु

करमाड रेल्वे अपघाताची ट्रायल घेतली; कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून चौकशी सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देकरमाड रेल्वे अपघातात १६ मजूर चिरडले गेले होते

औरंगाबाद : बदनापूर - करमाडदरम्यान झालेल्या अपघाताची सिकंदराबाद येथील कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस)यांच्याकडून सोमवारी औरंगाबाद रेलवेस्टेशनवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अपघातातील चालकाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्याच वेळेत रेल्वेच्या दोन ट्रायल घेण्यात आल्याचे समजते. त्यातून अपघात नेमका कसा घडला, हे जाणून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली

चौकशीसाठी जालना ते औरंगाबाददरम्यानचे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. या चौकशीतून या अपघातास कोण जबाबदार आहे, हे समोर येणार आहे. सिकंदराबाद विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त राम कृपाल यांच्याकडून ही चौकशी करण्यात येत आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ते सामान्य नागरिक आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी या घटनेची चौकशी आहेत. सामान्य नागरिक तसेच ज्यांकडे या अपघाताविषयी काही पुरावा आहे, त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत आहे.

Web Title: Commissioner of Railway Safety conducts trial of Karmad accident; Inquiry of Jalna-Aurangabad employees started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.