पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:46+5:302020-12-17T04:26:46+5:30

औरंगाबाद : पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे यांच्या खासगी वाहनाने आकेफा मेहरीन या तरुणीला चिरडल्या प्रकरणात तपासी संस्थेने कोणतेही गांभीर्य ...

The Commissioner of Police should investigate himself | पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी करावी

पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी करावी

औरंगाबाद : पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे यांच्या खासगी वाहनाने आकेफा मेहरीन या तरुणीला चिरडल्या प्रकरणात तपासी संस्थेने कोणतेही गांभीर्य न दाखविल्यामुळे औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्वत: चौकशी करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वी. नलावडे आणि न्या. एम.जी. सेवलीकर यांनी दिले आहेत.

गरज पडल्यास तपासी अधिकारी बदलावा. आरोपीस पाठीशी घातल्याचे आढळल्यास संबंधित तपासीक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. प्रतिवादींना नोटीस बजावण्याचेही आदेश दिले. याचिकेची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

२२ एप्रिल २०१९ रोजी पाटे यांच्या खासगी कारने टॉऊनहॉल उड्डाणपुलावर आकेफाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली होती. उपचारादरम्यान २४ एप्रिल २०१९ रोजी पहाटे ती मरण पावली. याबाबत आकेफाचे वडील मोहम्मद जहीर यांनी ॲड. सईद एस शेख यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

५ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी पोलीस आयुक्तांनी सर्व रेकार्ड पाहून, घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षदर्शींची स्वतः चौकशी करावी. आरोपीस वाचविण्यासाठी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास संबंधित तपासीक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत .

Web Title: The Commissioner of Police should investigate himself