आयुक्तांचा दौरा रद्द; सिंचनाची बैठकही नाही
By Admin | Updated: January 14, 2016 23:13 IST2016-01-14T23:08:59+5:302016-01-14T23:13:35+5:30
हिंगोली : विभागीय आयुक्त उमाकांत दांगट जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासन जोरदार तयारीला लागले होते. मात्र ते येणार नसल्याने हिरमोड झाला.

आयुक्तांचा दौरा रद्द; सिंचनाची बैठकही नाही
हिंगोली : विभागीय आयुक्त उमाकांत दांगट जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासन जोरदार तयारीला लागले होते. मात्र ते येणार नसल्याने हिरमोड झाला. दुसरीकडे सिंचनावर १३ जानेवारी रोजी आयोजित केलेली बैठकही लांबल्याने हा प्रश्नही तसाच लटकून पडला आहे.
हिंगोलीत विभागीय आयुक्त येणार असल्याने महसूलसह जिल्हा परिषद व इतरही विभाग आढावा घेवून सज्ज झाले होते. अनेकांनी विभागीय आयुक्तांच्या दौऱ्यात त्यांची भेट घेण्याची तयारीही चालविली होती. मात्र अचानकच त्यांचा दौरा रद्द झाल्याची वार्ता आली अन् प्रशासन पुन्हा नियमित कामांत जुंपले.
हिंगोलीच्या सिंचनाचा अनुशेष या विषयावर राज्यपालांकडेही बैठक होणार होती. मात्र तीही लांबली. त्यामुळे या प्रश्न पुन्हा लटकत पडल्याचे दिसत आहे. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी प्रयत्न केल्यानंतर ही बैठक आयोजित झाली होती. तसे पत्रही आले मात्र पुन्हा भ्रमनिराशाच पदरी पडली. (जिल्हा प्रतिनिधी)