वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:17+5:302021-01-13T04:10:17+5:30
कन्नड : खुर्ची, सत्तेपेक्षा जनतेशी बांधिलकी ठेवणारेच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतात. काकासाहेब कवडे हे असेच नेतृत्व आहे, असे प्रतिपादन ...

वाणिज्य वार्ता
कन्नड : खुर्ची, सत्तेपेक्षा जनतेशी बांधिलकी ठेवणारेच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतात. काकासाहेब कवडे हे असेच नेतृत्व आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सीताराम जाधव यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक काकासाहेब कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
गजानन कॉलनीत काकासाहेब कवडे व नगरसेविका अनिता कवडे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन महाराज, कवडे महाराज, प्रा. रंगनाथ लहाने, नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे, चंद्रकांत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रकार राजानंद सुरडकर, डॉ. संजय गव्हाणे, नगरसेवक सुनील पवार, नगरसेवक युवराज बनकर, गोकुळ राठोड, पाणी पुरवठा सभापती कविता पंडित, विद्या काशिनंद, अस्लम पटेल, अनिल गायकवाड यांची उपस्थिती होती. राज्यभरातून विविध ठिकाणाहून लोक शुभेच्छा देण्यासाठी आले होते. डॉ. सदाशिव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आकाश बोलधने यांनी आभार व्यक्त केले.
फोटो :