वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:15+5:302021-01-13T04:10:15+5:30
वैजापूर : एम.आय.टी.पॉलिटेक्निक रोटेगाव येथे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांचा ऑनलाइन इंडक्शन प्रोग्राम झाला. यात विद्यार्थी, पालकांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य ...

वाणिज्य वार्ता
वैजापूर : एम.आय.टी.पॉलिटेक्निक रोटेगाव येथे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांचा ऑनलाइन इंडक्शन प्रोग्राम झाला. यात विद्यार्थी, पालकांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य किशोर एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सध्या विद्यार्थ्यांचा कल तंत्रशिक्षणाकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेमुळे आयटी क्षेत्रात मोठी भरारी आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीदेखील तंत्रशिक्षण क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्थेत उपलब्ध असलेल्या सुसज्य प्रयोगशाळा, १४ हजार पुस्तकांचे स्वतंत्र ग्रथांलय उभारले. अत्याधुनिक यंत्रणेने परिपुर्ण कार्यशाळा, कॉम्पस इंटरव्ह्यूच्या आयोजनासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेंटर, विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र कक्ष उभारले आहेत. प्रा. विवेक जोशी, प्रा. विजय तळेकर यांनी मार्गदर्शन केले. सिव्हील इंजिनीअर अनिरुद्ध देशपांडे, कंप्युटर इंजिनिअर श्रेया भाटिया, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन इंजिनीअर जालिंदर निकम, मेकॅनिकल इंजिनिअर प्रशांत गोरक्ष यांनी अनुभव शेअर केला आहे. नोकरी व व्यवसायाची माहिती विद्यार्थ्यांना करुन दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विवेक जोशी यांनी केली. तर प्रा. सतीश ए़डके यांनी आभार प्रदर्शन केले.
फोटो चार विद्यार्थ्यांचे फोटो